ETV Bharat / city

ज्येष्ठ पत्रकार विजय दिघे यांचा कोरोनामुळे मृत्यू

author img

By

Published : Apr 3, 2021, 5:17 PM IST

Senior journalist Vijay Dighe dies due to corona
जेष्ठ पत्रकार विजय दिघे यांचा कोरोनामुळे मृत्यू

ज्येष्ठ पत्रकार विजय दिघे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ईटीव्ही मराठीत अँकर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात २००० साली पदार्पण केले होते.

नागपूर - ज्येष्ठ पत्रकार विजय दिघे यांचे आज कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. विजय दिघे यांनी ईटीव्ही मराठीत अँकर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात २००० साली पदार्पण केले होते.

विजय दिघे हे अत्यंत मनमिळावू, मित्र जोडणारे आणि सतत सहकार्याच्या भूमिकेत असलेले टेलिव्हिजन माध्यमातील एक उत्साही व्यक्तिमत्व होते. एप्रिल २००० साली त्यांनी रामोजी राव यांच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये ईटीव्ही मराठीला वृत्तनिवेदक म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियात कारकीर्द सुरू केली. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही विजय यांचा आवाज बातम्यांमधून महाराष्ट्राने ऐकला. ईटीव्ही मराठीच्या "हॅलो इंडिया" या प्रातःकालीन कार्यक्रमाचे अँकर म्हणून विजय यांनी भारतातील अनेक राज्यांमध्ये घडणार्‍या जगावेगळ्या कथा महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत विजय यांचा संघर्ष फार मोठा आहे. या माध्यमात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विजय यांनी सतत धडपड केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत करिअर करण्यासाठीच विजय यांनी हैदराबाद गाठले होते. तेथून दिल्ली आणि नंतर नागपुरातील विजय यांचा प्रवास आता थांबला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.