ETV Bharat / city

Russia Ukraine War Impact Maharashtra : पूर्व विदर्भातून युक्रेन-रशियात जाणारा 8 हजार टन तांदूळ थांबला

author img

By

Published : Mar 2, 2022, 10:21 AM IST

Updated : Mar 2, 2022, 1:04 PM IST

Russia-Ukraine War Impact on Indian  maharshtra Vidarbha rice export
Russia-Ukraine War Impact on Indian : पूर्व विदर्भातून युक्रेन-रशियात जाणारा 8 हजार क्विंटल तांदूळ थांबला

युद्धामुळे ( Russia-Ukraine War ) पूर्व विदर्भातून युक्रेन-रशियात जाणारा 10 हजार टन तांदूळ थांबला आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योजकांना बसला आहे. युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने परिणाम ( Russia-Ukraine War Impact on Indian ) दिसायला सुरवात झाली. तसेच काही फार्मा कंपनीना सुद्धा याचा फटका बसतो आहे.

नागपूर - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia-Ukraine War ) पुकारलं आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहेत. या युद्धाचा भारतावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पूर्व विदर्भातून युक्रेन-रशियात जाणारा 10 हजार टन तांदूळ थांबला ( Russia-Ukraine War Impact on Indian ) आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योजकांना बसला आहे. युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने परिणाम दिसायला सुरवात झाली. तसेच काही फार्मा कंपनीना सुद्धा याचा फटका बसतो आहे. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काँसिलचे अध्यक्ष शिवा कुमार राव यांनी ईटीव्ही भारतला खास माहिती दिली आहे. ती जाणून घ्या या खास रिपोर्टमधून...

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
पूर्व विदर्भात उत्पादित होणारा तांदुळ तसेच छत्तीसगड भागातुन काही प्रमाणात उत्पादित तांदूळ हा नागपूरातून अनेक देशात निर्यात केला जातो. जवळपास 8 ते 10 हजार टन हा तांदूळ फक्त युक्रेन आणि रशियात या दोन देशाना निर्यात केला जात असून याला प्रति टन सुमारे 400 डॉलर इतका दर मिळत आहे. पण युद्धाचा परिस्थितीमुळे ब्लॅक सी मधून जाणारी शिपिंग कंपनी आता जहाज त्या भागात पाठवण्यास नकार देत आहे. त्यामुळे याचे परिणाम त्या देशात होणाऱ्या निर्यातीवर व्हायला सुरुवात झाली आहे. यात तांदुळासह अनेक वस्तूंची निर्यात भारतातून केली जाते. एचढेच नाही तर या देशाच्या मार्गावर मधल्या भागात येणाऱ्या इतर देशात सुद्धा युद्ध सुरू असल्याने त्या भागात निर्यात बंद असणार असल्याची माहिती वेदचे शिवकुमार राव यांनी सांगितले. याची भारतीय रुपयात सुमारे महिन्याला 30 ते 32 कोटी रुपयाचा उलाढालीवर याचा परिणाम होणार झाला आहे. उद्योजकांची आर्थिक कोंडी -


युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच दोन्ही देशांअंतर्गत आर्थिक व्यवहार बंद झालेले आहे. या काळात देशातील चलन बाहेर जाऊ नये, यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनीही निर्बंध लावले. त्यामुळे भारतीय उद्योजकांचे आर्थिक व्यवहार प्रभावित झाले. व्यवहारातील निर्यात मालाचे पैसे आता वेळेवर मिळू शकणार नाही. शिवाय युद्ध थांबल्यानंतर ते व्यवहार केव्हा सुरळीत होईल आणि पैसे परत मिळतील याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योजकांची आर्थिक कोंडी होणार आहे.

शेतकऱ्यांना फटका नाही -


पूर्व विदर्भातून उत्पादित होणारा तांदूळ मोठ्या प्रमाणात रशिया आणि युक्रेन देशासह, पूर्व आफ्रिका आणि त्या भागात सुद्धा विकला जातो. तसेच चीन यासह इतर देशांमध्ये विदर्भातील तांदूळ निर्यात होत असतो. त्यामुळे यूक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे या तांदळाची निर्यात थांबली असली तरी त्याचा कुठलाही फटका शेतकऱ्यांना बसणार नाही. पण आर्थिक व्यवहाराचे झालेल्या कोंडीमुळे उद्योजकांना मात्र याचा फटका बसणार आहे. शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेवरील पुढच्या काळात या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक परिणाम हळूहळू दिसतील याची सुरुवात किंवा विदर्भातील तांदूळ या धान्यापासून झालेली म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच फार्मा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात औषध साठा हा कंपन्यांच्या माध्यमातून युक्रेन आणि रशिया मध्ये पाठवला जातो त्याच्यावरही याचा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.


हेही वाचा - Indian Student Death In Ukraine : 'परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणा'; नवीनच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे टि्वट

Last Updated :Mar 2, 2022, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.