शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

author img

By

Published : Sep 12, 2021, 7:40 PM IST

केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यांवरील पुलामुळे घडलेल्या प्रकाराबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांनीही लगेच यासंदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्यात.

नागपूर - सातारा-सांगली-कोल्हापूर या नद्यांवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरील भरावामुळे यावर्षी सीमा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात महापुराने थैमान घातले. पुणे-बंगळुरू व रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगांव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका व आंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यांवरील पुलामुळे घडलेल्या प्रकाराबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांनीही लगेच यासंदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्यात.

शेट्टींनी गडकरींना निवेदन दिलं
शेट्टींनी गडकरींना निवेदन दिलंशेट्टींनी गडकरींना निवेदन

राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यावरील पुलालगतच्या भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये महापुराने थैमान घातले होते. तसेच पाणीपातळी वाढून ते नागरी वस्तीत शिरले. पाणी कमी होण्यास वेळ लागल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगली, कोल्हापूर व बेळगांव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्यांवरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन दोन कमानीचे बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहित होईल असे चर्चेदरम्यान सांगण्यात आले.

...यामुळे पावसाचे पाणी मंदावले -

या पावसाचे पाणी कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी या नद्यांवर पूल बांधण्यात आले. या राष्ट्रीय मार्गावरील पुलांचे निर्माण कार्य करतांना दोन्ही बाजूने जवळपास 2 किलोमीटर भराव देण्यात आला आहे. जेव्हा महापूर येतो तेव्हा नद्यांच्या पात्राबाहेर पाऊस दोन पाणी वाट शोधत पसरत जाते. पण पूल बंधा-याचे काम करतात. म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत गती मंदावली आहे.

कमानी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा -

सध्या रत्नागिरी-नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबा घाट ते मिरज शहर बायपास रोडवरील मार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पुल बांधकाम आणि भराव टाकण्याचे काम प्रगतीत सुरू केले आहे. या कामातही पाणी प्रवाहित होण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांसोबत बैठक घेऊन पुलाचा आणि रस्त्याचा भराव कमी करून कमानी वाढविणे गरजेचे आहे. तरी केंद्र सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करणे निधी उपलब्ध करून तातडीने या कामांना सुरूवात करण्याची मागणी यावेळी केली.

अधिकाऱ्यांना अभ्यास करण्याच्या सूचना -

यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या १५ दिवसात महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांच पथक पाठवण्याच्या सूचना मंत्रालयातील संबंधित अधिका-यांना दिल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक, अमित पाटील, सागर मादनाईक, हर्षद इंगळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.