ETV Bharat / city

Garbage Collection by QR Code : नागपुरात कचरा संकलनासाठी आता QR कोड प्रणाली

author img

By

Published : Mar 5, 2022, 6:17 PM IST

नागपूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission) कचरा संकलनाची व्यवस्था अधिक प्रभावी, व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड (QR Code) पद्धतीवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम'ची (Smart Waste Management System) सुरुवात गांधीबाग झोन अंतर्गत करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे.

nagpur
नागपूर पालिका

नागपूर - नागपूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission) कचरा संकलनाची व्यवस्था अधिक प्रभावी, व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड (QR Code) पद्धतीवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम'ची (Smart Waste Management System) सुरुवात गांधीबाग झोन अंतर्गत करण्यात आली आहे. कचरा संकलन (Garbage Collection) करणारे स्वच्छतादूत घरोघरी वेळेवर येत नाहीत, त्यांच्या वेळा निश्चित नाहीत. अशा कचरा संकलनाबाबत नगरसेवक आणि नागरिकांच्या येत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने केरळच्या धर्तीवर क्यूआर कोड आधारित संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना

'स्मार्ट प्रकल्प स्मार्ट सिटी'च्या माध्यमातून क्यूआर कोड सिस्टीम सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कचरा संकलन केलेल्या घराचा क्रमांक, घरमालकाचे नाव अशी माहिती अधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे. नक्कीच या 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'मुळे शहरातील कचरा संकलन अधिक व्यापक आणि पारदर्शक होईल. तसेच नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे निराकरणसुद्धा होईल, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

वेस्ट मॅनेजमेंट प्रभावी करण्याचा प्रयत्न:-

कचरा संकलन करणारी गाडी घरापर्यंत येत नाही, नियमित कचरा उचलला जात नाही, अशा विविध प्रकारच्या तक्रारींवर आता पुढे लगाम बसणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार आहे.

घरांवर क्यूआर कोड लावण्याची झाली सुरुवात:-

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्यावतीने नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम गांधीबाग झोन येथून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेकडे सतत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या अभिनव सिस्टीम अंतर्गत दहा घरांवर क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आधी कोडवर आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.