ETV Bharat / city

पोलीस भरती घोटाळा : कोणतीही टोळी सक्रिय नाही, आणखी 8 ते 10 आरोपी पोलिसांच्या रडारवर - अमितेशकुमार

author img

By

Published : Jan 10, 2022, 10:11 PM IST

Updated : Jan 10, 2022, 10:18 PM IST

SP Amitesh Kumar
SP Amitesh Kumar

नागपूर शहर पोलीस भरती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.

नागपूर - नागपूर शहर पोलीस भरती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. काही उमेदवारांनी संगनमत करून डमी उमेदवार परीक्षेला बसवले होते का, अशी शंका उपस्थित झाली असून त्याअनुषंगाने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी आठ ते दहा उमेदवार पोलिसांच्या रडारवर आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात पोलीस भरती घोटाळा चांगलाच गाजतो आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 कालावधीत पोलीस शिपाई, वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. शाररीक आणि बौद्धिक परीक्षेत काही उमेदवारांनी स्वतःच्या जागी डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र गुन्हे शाखा पथकाला या घोटाळ्याची चाहूल लागली. परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच गुन्हे शाखेने तिघांना औरंगाबाद येथून अटक केली आहे. ते तिघेही औरंगाबाद येथीलच निवासी आहेत.

हे ही वाचा - Meeting on ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब, शरद पवार यांची बैठक; सदावर्तेंच्या जागी नवे वकील, पवार म्हणाले...

आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर -

पोलीस शिपाई, वाहन चालक पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीत काही उमेदवारांनी आपल्या जागी डमी उमेदवारांना परीक्षेत बसवल्याचा खुलासा झाल्यानंतर नागपूर शहर पोलीस विभागाकडून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया तपासून बघितली जात आहे, ज्यामध्ये पोलिसांना आणखी आठ ते दहा आरोपी सहभागी आल्याचा संशय आहे. त्या आधारे पोलिसांनी त्या आरोपींचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू केले असून लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Last Updated :Jan 10, 2022, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.