ETV Bharat / city

IIM Nagpur : आयआयएम नागपूरच्या कॅम्पसचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या खास आयआयएमबद्दलच्या गोष्टी

author img

By

Published : May 7, 2022, 5:48 PM IST

Updated : May 7, 2022, 6:36 PM IST

IIM Nagpur
इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर

इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या ( Indian Institute of Management Nagpur ) 'आयआयएम' नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन रविवारी 8 मे रोजी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार ( Campus of IIM Nagpur will be inaugurated by President Ramnath Kovind ) आहे

नागपूर - इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या ( Indian Institute of Management Nagpur ) 'आयआयएम' नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन रविवारी 8 मे रोजी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले येत असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. शहराच्या अगदी शेजारी असलेल्या मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सद्या 668 विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे.

आयआयएम नागपूरच्या कॅम्पस राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

आयआयएम नागपूर बद्दल काही खास बाबी -

  • आयआयएमला नव्या कॅम्पसमुळे झळाळी - 132 एकराच्या या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन आणि आस्थापनाचे महत्वाचे केंद्र उघडण्यात आले. यात 665 विद्यार्थी विविध शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने ह्या वर्गखोलया सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार असून देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे. 2015 ला सुरु झालेल्या या संस्थेला नव्या कॅम्पसमुळे झळाळी आली आहे.
  • राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार - इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन रविवारी 8 मे रोजी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी 23 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन होणार होते. दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला होता.
IIM Nagpur
अत्याधुनिक क्लास रूम्स
  • अत्याधुनिक क्लास रूम्स - आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत. या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत, त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण 7 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.
IIM Nagpur
अत्याधुनिक क्लास रूम्स
  • आयआयएम नागपूरची जगभरात चर्चा - आयआयएम नागपूरची जागतिक स्तरावरील अनेक विद्यापिठांसोबत भागिदारी आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेचं भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूरचे देशासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील महत्त्व आहे. या संस्थेमुळे नागपूरचे नाव व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत असणाऱ्या शैक्षणिक राष्ट्रांशी जोडल्या गेले आहे. त्यामुळे या संस्थेची चर्चा देशभर आहे.
  • जागतिक विद्यापीठांसोबत भागिदारी - देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे. इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेनमार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इंस्टिट्युशन युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझीनेस स्कुल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका, इंस्टिट्युट मांइन्स टेलिकॉम, फ्रॉन्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल,डेनमार्क, च्योव युनिर्व्हसिटी ग्रॅझ्युएट स्कुल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत या संस्थेचा सामजस्य करार झाला आहे.
  • 2015 साली आयआयएम नागपूरात सुरू - जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या नागपुरचे पाहिले सत्र जुलै 2015 पासून सुरू झाले होते. त्यावेळी स्वतःची इमारत नसल्याने विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेच्या म्हणजेचं (व्हीएनआयटी) येथील कॅम्पसमध्ये आयआयएम'चे क्लासेस सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा - Nana Patole On Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' निर्णयामुळे गेले; नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

Last Updated :May 7, 2022, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.