ETV Bharat / city

Maharashtra Crisis : भडगावातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र

author img

By

Published : Jun 26, 2022, 4:44 PM IST

Updated : Jun 26, 2022, 7:57 PM IST

Maharashtra Crisis :
भडगावातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र

बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन भडगावातील शिवसैनिकानी केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना गुवाहाटीत दाखल झालेत. या अनुषंगाने भडगावातील शिवसैनिक यांनी युवा सेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटिल याच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे रक्त काढून रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना समर्थनाचे पत्र लिहून पाठविले.

जळगाव - बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन भडगावातील शिवसैनिकानी केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना गुवाहाटीत दाखल झालेत. या अनुषंगाने भडगावातील शिवसैनिक यांनी युवा सेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटिल याच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे रक्त काढून रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना समर्थनाचे पत्र लिहून पाठविले.

भडगावातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र

रक्ताने लिहिलेले पत्र - तर दुसरे पत्र एकनाथ शिंदे यांनाही रक्ताने लिहिलेले पत्र लिहले. या पत्रात त्यांनी बंडखोर आमदारांना परत घेऊन येण्याची विनंती केली. यावेळी भडगावच्या छञपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकानी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शन कोले. तर आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्र्याच्या सोबत आहेत असे मत युवा सेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटिल यानी व्यक्त केले.



यावेळी युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटिल, संजय गांधी निराधार अध्यक्ष गोरख पाटील, शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील,माजी नगरसेवक शंकर मारवाडी,मनोहर चौधरी,गणेश अण्णा चौधरी, दिपक पाटील,जे.के. पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील,विश्वास पाटील,माधव राजपुत,भाऊसाहेब पाटिल,पुष्पाताई परदेशी आदिन सह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा - Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

Last Updated :Jun 26, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.