ETV Bharat / city

काँग्रेस नेत्यांशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात ईडीची चौकशी

author img

By

Published : Oct 28, 2021, 6:59 PM IST

श्रीराम टॉवर
श्रीराम टॉवर

नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम टॉवर आहे. या इमारतीच्या सहाव्या माळ्यावर मुंबईवरून आलेल्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ईडीचे एक पथक या कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये ४ ते ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात सुरू असल्याने याचा नागपुरातील काँग्रेस नेत्यासोबत काय संबंध आहे? या संदर्भात कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.

नागपूर - नागपूर शहरातील एका प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात ईडीच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. ज्या कार्यालयात चौकशी सुरू आहे, ते कार्यालय नागपूरच्या काँग्रेस नेत्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कोणत्या कारणाने चौकशी सुरू आहे, या संदर्भात कोणताही खुलासा चौकशी करणाऱ्या पथकाकडून करण्यात आलेला नाही.


नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम टॉवर आहे. या इमारतीच्या सहाव्या माळ्यावर मुंबईवरून आलेल्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ईडीचे एक पथक या कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये ४ ते ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात सुरू असल्याने याचा नागपुरातील काँग्रेस नेत्यासोबत काय संबंध आहे? या संदर्भात कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.

हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय माहिती नवाब मलिक, आव्हाडांनी उघड केली, रश्मी शुक्लांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.