ETV Bharat / city

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर

author img

By

Published : Jul 7, 2022, 5:07 PM IST

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर ( Two-Days Tour ) आले आहेत. त्यांचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले.

Governor Bhagat Singh Koshyari and Nitin Gadkari
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि नितीन गडकरी

नागपूर - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर ( Two-Days Tour ) आले आहेत. त्यांचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन ( Arrived at Nagpur Airport )झाले. त्यानंतर लगेच ते अकोला येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक नेते उपस्थित होते.

नितीन गडकरींकडून स्वागत - विमानतळावर त्यांचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले. यावेळी सर्वांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना गुलाब पुष्प दिले

असा आहे कार्यक्रम - नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेच ते अकोल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही रवाना झालेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर शेगाव (जि. बुलडाणा)कडे प्रयाण करतील. शेगाव येथील गजानन महाराज मंदिराला भेट देतील. त्यानंतर शासकीय वाहनाने ते अकोल्याकडे प्रयाण करतील. अकोला येथून सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील. राजभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठ वाजता नागपूर येथून विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

हेही वाचा - Thieves Stole 4.5 Lakh : मेडिकलचे शटर वाकवून चोरट्यांनी साडेचार लाख चोरले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.