ETV Bharat / city

leopard in Nashik city : नाशिक शहरात बिबट्याचा मुक्त संचार,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Jun 18, 2022, 11:36 AM IST

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार ( Free movement of leopard in Nashik city ) सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( Fear among citizens ) पसरले आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलकमल मार्बलच्या परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट ( Panic among employees ) निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद ( Demand for seizure of leopard ) करावे अशी मागणी नागरीकांनी केला आहे.

Free movement of leopard in Nashik city
नाशिक शहरात बिबट्याचा मुक्त संचार

नाशिक- नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार ( Free movement of leopard in Nashik city ) सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( Fear among citizens ) पसरले आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलकमल मार्बलच्या परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट ( Panic among employees ) निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद ( Demand for seizure of leopard ) करावे अशी मागणी नागरीकांनी केला आहे.


नाशिक शहरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू - दोन दिवसापूर्वी लवाटे नगर परिसरात बिबट्याचे एका प्रवाशाला दर्शन झाला होते. यावेळ त्यांनी बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून हा व्हिडिओ वन खात्याला पाठवला होता. त्यानंतर वन खात्याने या परिसरात कसून शोध घेतला मात्र, बिबट्या आढळून आला नाही. अशात दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील नीलकमल मार्बल्स परिसरात दिसून आला आहे. यामुळे आता कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कामगार वर्गाने केली आहे.


बिबट्याचे हॉटस्पॉट - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट आहेत. या तालुक्यातून गोदावरी,दारणा कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजननासाठी उसाचे शेत सुरक्षित जागा आहे. या सोबत गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - warangal person died in agnipath clash - फिजिकल पास करुन लेखी परीक्षेची तयार करत होता राकेश, आंदोलनात गोळीचा ठरला शिकार

हेही वाचा - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात माझा सहभाग नाही, संशयित आरोपी संतोष जाधव याची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.