ETV Bharat / city

नागपुरात दोन महिन्यांत उष्माघाताचे 11 बळी, आकडा वाढण्याची भीती

author img

By

Published : May 10, 2022, 3:01 PM IST

नागपुरात दोन महिन्यांत उष्माघाताचे 11 बळी
नागपुरात दोन महिन्यांत उष्माघाताचे 11 बळी

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरमध्ये उन्हाळा तापायला सुरुवात होते. मात्र, या वर्षी फेब्रुवारी पासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागले होते. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा कठीण जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान विभागाचे दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसतो आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपुरात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर - यावर्षी नागपूरसह संपूर्ण विदर्भ अभूतपूर्व अशा उन्हाळ्याला तोंड देत आहे. उन्हाची दाहकता इतकी वाढली आहे की दुपारच्या वेळी तर शहरात आणि ग्रामीण भागात अघोषित कर्फ्यु लागल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. उत्तरेकडील राजस्थानमधून एका-मागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचा पारा 45 ते 46 डिग्री पर्यत पोहोचला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात एकट्या नागपूरात 11 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. गेल्या आठ वर्षांतील हा उच्चांकी आकडा आहे.

फेब्रुवारी पासूनच उन्हाचे चटके - मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरमध्ये उन्हाळा तापायला सुरुवात होते. मात्र, या वर्षी फेब्रुवारी पासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागले होते. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा कठीण जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान विभागाचे दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसतो आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपुरात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 13 दिवसात 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या दोन वर्षात उष्माघातामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याची नोंद आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.

उष्मघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ - विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा अकोला या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ डिग्रीच्या पुढे गेले आहे. विदर्भात उन्हाच्या तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. एप्रिल महिन्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 100 च्या वर गेली आहे.

‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरचं - नागपुरात पारा ४५ अंशावर असतानाही हिट अ‍ॅक्शन प्लॅनची हवा निघाल्याचे चित्र आहे. प्रखर उन्हापासून लोकांचा बचाव व्हावा, यासाठी दरवर्षी नागपूर महापालिकेने‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला जातो ,त्याअंतर्गत दुपारी शहरातील उद्याने खुली ठेवणे, ठिक ठिकाणी प्याऊ लावणे, ग्रीन नेटची व्यवस्था करायची असते. उन्हाचा पारा ४५ अंशावर गेल्यानंतर देखील हिट अ‍ॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. नागपुरात वर्ष २०१६ पासून हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्याला सुरुवात करण्यात आली होती, त्या पहिल्या वर्षात चौका-चौकात ग्रीन नेट लावण्यात आले होते,मात्र यावर्षी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

दुपारी १२ ते ४ सिग्नल बंद - नागपूरात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. अशा स्थितीत सायकल,दुचाकी किव्हा रिक्षात सिग्नलवर थांबणे म्हणजे वाहन चालकांसाठी त्रासदायक होत आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी २१ सिग्नल दुपारी शहरातील १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.