ETV Bharat / city

Collarwali Tigress : कॉलरवाली सुपर मॉमने घेतला शेवटचा श्वास... व्याघ्र प्रेमी हळहळले

author img

By

Published : Jan 16, 2022, 10:02 PM IST

Updated : Jan 16, 2022, 10:07 PM IST

मध्य प्रदेशच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने व्याघ्र प्रेमी हळहळले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली 'कॉलरवाली' नावाने ( Collarwali supermom tigress died ) आणि 29 शावकांना जन्म देणारी 'सुपरमॉम' या नावाने तिची वेगळी ओळख आहे.

collarwali supermom tigress died
वाघिणीचे छायाचित्र

नागपूर - मध्य प्रदेशच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने व्याघ्र प्रेमी हळहळले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली टी - 15 'कॉलरवाली' नावाने ( Collarwali supermom tigress died ) आणि 29 शावकांना जन्म देणारी 'सुपरमॉम' या नावाने तिची वेगळी ओळख आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिला आणि तिच्या शवकांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असायची. पण, वृद्धापकाळाने तिचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.

collarwali supermom tigress died
वाघिणीचे छायाचित्र

हेही वाचा - School Reopen Maharashtra : मेस्टाच्या निर्णयामुळे राज्यातील 'या' शाळा सुरु होणार

देहरादूनमध्ये मिळाले नाव

collarwali supermom tigress died
वाघिणीचे छायाचित्र

11 मार्च 2008 मध्ये भारतीय वन्य जीव संस्था देहरादूनच्या तज्ज्ञांनी या वाघिणीला ( Supermom tigress died ) रेडिओ कॉलर घातली होती. तेव्हापासून या वाघिणीला कॉलरवाली वाघीण म्हणून ओळखल्या जाते. पर्यटकांना ही सर्वात जास्त वेळा दिसून येणारी वाघीण आहे. कॉलरवाल्या वाघिणीची तिच्या आई आणि भावा बहिणींबरोबर बनवलेली डॉक्युमेंट्री 'टाइगर स्पाय इन द जंगल' देखील खूप लोकप्रिय आहे.

29 शवकांना दिला जन्म

collarwali supermom tigress died
वाघिणीचे छायाचित्र

कॉलरवाली वाघीण ( Collarwali tigress madhya pradesh ) सतराव्या वर्षी वृद्धापकाळाने थकलेली होती. काही दिवसांपासून मध्यप्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्पात तिची काळजी घेतली जात असताना शनिवारी सायंकाळी सीताघाट जवळच्या भुरादत्त पाण्याच्या ओढ्याजवळ तिचा मृत्यू झाला. तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पात 2005 मध्ये जन्म घेतल्यानंतर तिने 2008 मध्ये तीन शावकांना पहिल्यांदा जन्म दिला. पण, या शावकांचा अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत मृत्यू झाला होता. त्यानंतर कॉलरवली वाघिणीने सात वेळा शावकांना जन्म दिला आहे. आतापर्यंत तिने ऑक्टोबर 2008 मध्ये चार शावक, त्यानंतर 2010 मध्ये 5 शावकांना एकाच वेळी जन्म देणारी दुर्लभ वाघीण अशीही तिची ओळख ठरली. 2012 मध्ये तिने तीन शावकांना जन्म दिला. त्यानंतर 2015, 2017, 2019 यावर्षात आतापर्यंत तिने 29 शवकांना जन्म दिला आहे.

हेही वाचा - Airbags Mandatory For Back Seaters : आता गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही लावावी लागणार एअरबॅग.. गडकरींची घोषणा

Last Updated :Jan 16, 2022, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.