Vidarbha High Temperature Reasons : 'या' कारणांमुळे विदर्भातील तापमानात होत असते वाढ

author img

By

Published : May 12, 2022, 5:43 PM IST

Updated : May 12, 2022, 5:55 PM IST

Vidarbha High Temperature Reasons

सूर्याच्या किरणांचा थेट मारा विदर्भावर ( Direct sunlight on Vidarbha ) होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग ( No plateaus or mountains in Vidarbha ) आहे. त्यामुळे उत्तरंच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत येत ( Hot winds blowing directly from Rajasthan to Vidarbha ) असल्याने देखील येथिल तापमान इतर शहरांच्या तुलनेत जास्त नोंदवले जात असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू ( Mohanlal Sahu Director Regional Meteorological Department ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

नागपूर - प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची 'मे' महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिम्मत करत नाही. देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या चार ते पाच शहरांमध्ये तापमान इतके का वाढते? या मागील कारणे कोणते आहेत? याचा शोध घेतला तेव्हा काही रंजक माहिती पुढे आली आहे. विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणांचा थेट मारा विदर्भावर ( Direct sunlight on Vidarbha ) होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग ( No plateaus or mountains in Vidarbha ) आहे. त्यामुळे उत्तरंच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत येत ( Hot winds blowing directly from Rajasthan to Vidarbha ) असल्याने देखील येथिल तापमान इतर शहरांच्या तुलनेत जास्त नोंदवले जात असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू ( Mohanlal Sahu Director Regional Meteorological Department ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

वाढत्या तापमानावर प्रतिक्रिया देताना प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक

यावर्षी विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा शहराचे दिवसांचे तापमान 45 ते 46 डिग्री पर्यंत गेले होते. तर रात्रीच्या वेळी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर भागांमध्ये देखील अनुभवायला मिळते.


कर्करेषेवरील विदर्भ : भौगोलिक दृष्ट्या नागपूर आणि विदर्भाचे वेगळेपण आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यभागी वसलेले आहे. मात्र, विदर्भ हा प्रदेश कर्करेषेवरील भूभाग आहे. त्यामुळे सूर्य किरणे थेट विदर्भात पडत असल्याने त्याची दाहकता अधिक वाढते. त्यामुळे विदर्भातील तापमान वाढलेले असते, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे.


वाढते औद्योगिकीकरण : गेल्या काही वर्षात विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांचे अतिशय तीव्र वेगात औद्योगिकीकरण झाले आहेत. यामध्ये सिमेंट कारखाने, कोळसा खाणी, मोठ मोठे वीज निर्मिती प्रकल्पांमुळे सुद्धा प्रदूषण आणि तापमान वाढले असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढला आहे.


वृक्षतोड वाढ : विदर्भ हा वनराईने नटलेला प्रदेश आहे. मात्र, गेल्या काही काळात वेगात सुरू असलेल्या औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे सुद्धा विदर्भातील तापमान वाढण्यामागचे एक कारण सांगितले जाते आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते आहे. त्या प्रमाणात वृक्षारोपण होताना दिसत नसल्याने विदर्भाची हिरवळ कमी झाली आहे.


हेही वाचा - Vidarbha Weather Update : असानी चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता

Last Updated :May 12, 2022, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.