ETV Bharat / city

Jwala Dhote : भाजपा पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊ शकते, मग मी का नाही?, ज्वाला धोटेंचा पोलिसांना सवाल

author img

By

Published : Jun 18, 2022, 5:37 PM IST

Updated : Jun 18, 2022, 7:13 PM IST

भाजपावाले पत्रकार परिषद घेऊ शकतात ( Bjp Press Conference Police Headquarters In Nagpur ), आम्हालाही घ्यायची आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी केली ( Jwala Dhote Question Nagpur Police ) आहे.

Jwala Dhote
Jwala Dhote

नागपूर - पोलीस आयुक्त कार्यालयात भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली ( Bjp Press Conference Police Headquarters In Nagpur ) होती. त्याचाच धागा पकडून त्यांना पत्रकार परिषद घेऊ देता, मग आम्हालाही घ्यायची आहे, असे म्हणत नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तसेच, राजकीय पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेतात कसे, असा उपस्थित करत धोटे यांनी भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ( Jwala Dhote Question Nagpur Police ) केली.

ज्वाला धोटे या शनिवारी ( 18 जून ) काही पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी भाजपाने पत्रकार परिषद घेतलेल्या सहाव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. तेव्हा पोलीस आणि ज्वाला धोटे यांच्यात शाब्दिक वाद झाला.

ज्वाला धोटे म्हणाल्या की, पोलीस भवन हे प्रशासकीय इमारत असताना राजकीय पक्षाला पत्रकार परिषद घेण्यास का थांबवले नाही. जर मला आतमध्ये निवेदन देऊन पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, तर राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करावा. त्यांना परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. जर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करू. तसेच, पाणी त्याग करण्याचा इशाराही ज्वाला धोटे यांनी दिला आहे.

ज्वाला धोटे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

काय आहे प्रकरण? - काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाई विरोधात आंदोलन केले. यात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. या संदर्भातच कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह काही पदाधिकारी पोलीस आयुक्त यांना शुक्रवारी भेटले. त्यानंतर त्याच हॉलमध्ये पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांना संबोधित केले. याविरोधात प्रशासकीय कार्यालयात राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रेस कॉन्फरन्स कसे घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Legislative Council Election : आम्हाला थोड्या मतांची गरज ; सेनेसोबतच्या अपक्षांना राष्ट्रवादी, काँग्रेसकडून संपर्क

Last Updated :Jun 18, 2022, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.