ETV Bharat / city

Nagpur Corona Update : पालकांची चिंता वाढली! नागपुरातील एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jul 18, 2022, 8:50 AM IST

Updated : Jul 18, 2022, 9:03 AM IST

कोरोनाचा नागपूरमध्ये विस्फोट झाला आहे. एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची ( corona infection to students ) लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे.

कोरोना
कोरोना

नागपूर - शहरातील एका खासगी शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची ( 38 students corona cases in Nagpur ) लागण झाली आहे. ही माहिती नागपूर आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने रविवारी दिली. नागपूर जिल्ह्यात रविवारी 262 नवीन कोरोना रुग्ण ( Nagpur corona cases ) आढळले आहेत. यात नागपूर शहरातील 100 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णाची आजवरची एकूण संख्या 5,69,690 वर ( corona patient deaths in Nagpur ) पोहोचली आहे.

कोरोनाने आजवर 10,339 रुग्णांचा ( corona cases in Nagpur ) मृत्यू झाला आहे. नागपूर शहरातील जयताळा भागातील ( Jaitala area in Nagpur city ) एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. रविवारी उपलब्ध झालेल्या चाचणीच्या निकालांनुसार, 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. नागपूर जिल्ह्यात 1,221 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत सध्या २६० बेडवर रुग्ण-मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


२.५९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ६५६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २७६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात २.५९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ३९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २१ हजार ०९५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९९ हजार १६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ३०० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२७९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३० टक्के इतका आहे.

हेही वाचा-Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20,044 कोरोना रुग्णांची नोंद, 56 जणांचा मृत्यू

हेही वाचा-Mumbai High Court: उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला मृत कोरोना योद्धांना 50 लाख रुपयांची विमा रक्कम देण्याचे आदेश

Last Updated :Jul 18, 2022, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.