ETV Bharat / city

नागपुरात ऑक्सिजन प्लँटवर 24 तास पोलीस तैनात

author img

By

Published : Apr 21, 2021, 5:22 PM IST

ऑक्सिजन प्लॅंटवर पोलीस तैनात
ऑक्सिजन प्लॅंटवर पोलीस तैनात

जिल्ह्यात 71 हजारच्या घरात सक्रिय रुग्ण आहे. तसेच घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे, व ॲाक्सीजनचा काळाबाजार होऊ नये, यासाठी शहरात सध्या बुट्टीबोरी आदित्य एअर प्रॅाडक्शन या ॲाक्सीजन प्लँटवर 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले आहे. यातच भर म्हणून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे नागपूर शहरात आयनॉक्स एअर प्लँटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्याला पुरवल्या जाणाऱ्या बुट्टीबोरीच्या आयनॉक्स एअर व आदित्य एअर प्लँटमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार रोकला जावा यासाठी हा बंदोबस्त करण्यात आला आहे.

नागपूरात ऑक्सिजन प्लँटवर 24 तास पोलीस तैनात

ऑक्सिजनचा तुटवडा
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच दररोज 6 ते 7 हजार नवीन कोरोना बाधितांची भर पडत आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णालयातील मेडिकलला ऑक्सिजन टँकरच्या साह्याने लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बुट्टीबोरी एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लँटमधून ऑक्सिजन सिलेंडर भरून दिल्या जात आहे.

पोलिसांच्या देखरेखीतच ऑक्सिजनचे वितरण

याच ठिकाणाहून विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात सुद्धा ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे या प्लॅंटवर ताण वाढला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनीही केवळ रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करावा अश्या सूचना केल्या आहेत. इथून दिला जाणारा ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा अधिकृत परवानाधारकांनाच व्हावा, इथे काळाबाजारी होऊ नये, यामुळे 24 तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पोलिसांच्या देखरेखीतच ऑक्सिजनचे वितरण केले जात आहे.

हेही वाचा - उपमुख्यमंत्र्यांना मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवा - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.