ETV Bharat / city

March Month Murder Cases Nagpur : नागपुरात फेब्रुवारीत शून्य तर मार्च महिन्यात 10 हत्येच्या घटना

मार्च महिन्यात शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 खुनाच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय 23 वर्षीय निकिता चौधरी जळीत आत्महत्या प्रकरणाने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मार्च महिन्यात 10 खुनाच्या घटना घडल्या असल्या तरी त्यापैकी 6 ते 7 हत्या या नातेसंबंधातील व्यक्तींनी केला असल्याचे मत शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

चौकशी करताना पोलीस संग्रहित छायाचित्र
चौकशी करताना पोलीस संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 1, 2022, 4:50 PM IST

Updated : Apr 1, 2022, 6:34 PM IST

नागपूर - संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही, म्हणून नागपूर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र मार्च महिन्यात एका-मागे एक खुनाच्या घटना घडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील शून्य हत्येचा गाजावाजा पोलिसांनी केला. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण फेब्रुवारीचा बॅकलॉग एकट्या मार्च महिन्यात भरून निघाला आहे. मार्च महिन्यात शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 खुनाच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय 23 वर्षीय निकिता चौधरी जळीत आत्महत्या प्रकरणाने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मार्च महिन्यात 10 खुनाच्या घटना घडल्या असल्या तरी त्यापैकी 6 ते 7 हत्या या नातेसंबंधातील व्यक्तींनी केला असल्याचे मत शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. गुन्हेगारांना वेसण घालण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळाले आहे. मात्र कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटना रोखणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार

जानेवारीमध्ये नागपुरात एकूण 4 हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकही हत्या झाली नव्हती. मात्र मार्च महिन्यात शहरात 10 हत्या झाल्या आहेत. असे असले तरी बहुतांश हत्या कौटुंबिक वादातून घडल्या असल्याची माहिती अगदी सत्य आहे. आईने स्वतःच्या मुलाला संपवले, जावयाने मेहुण्याची हत्या केली, एका बापाने पत्नी आणि मुलीचा जीव घेतला अशा प्रकारच्या घटना सर्वाधिक घडल्या आहेत.

पहिली हत्या : मार्च महिन्यात हत्येची पहिली घटना 5 मार्च रोजी वाठोडा रिंग रोडवरील जयस्वाल दारूभट्टी जवळ घडली होती. राजू चेलीकसवाई (३५) नामक तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली होती. दुसरी हत्या : हत्येची दुसरी घटना 12 मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर येथे घडली होती. मानसिक आजारातून विलास गवते नामक दूध विक्रेत्याने त्याची पत्नी रंजना आणि मुलगी अमृता यांची झोपेतच गळा चिरून हत्या केली होती.

तिसरी हत्या : 13 मार्च रोजी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत २३ वर्षीय शुभम नानोटेचा गळा आवळून खून त्याचा मोठा भाऊ नरेंद्र नानोटे आणि आई रंजना नानोटे यांनी संगणमत करून केला होता. चौथी हत्या : 15 मार्च रोजी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ कार्यालयासमोर विक्रांत उर्फ भुऱ्या त्याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती

पाचवी हत्या : 15 मार्च रोजीच पारडी चौकात मजुरीचे काम करणाऱ्या सोनू नमक एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. सहावी हत्या : सहावी हत्येची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात घडली होती. 22 मार्च रोजी काही गुन्हेगारांनी शुल्लक कारणावरून मनीष यादव तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली होती.

सातवी हत्या : मार्च महिन्यातील सातवी हत्या ही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. प्लास्टिक कारखान्यात काम करणारा मजूर सलीरामचा खून झाला होता. आठवी हत्या : 27 मार्च रोजी कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी या परिसरात शाळेच्या बसवरील कंडक्टर असलेल्या दीपा दास नामक महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरलेला आढळून आला होता. याप्रकरणी पोलीस आणि मृतक दीपाच्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली होती.

नववी हत्या : 31 मार्च रोजी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा डोंगरगाव येथील बंद टोल नाक्या जवळ घडली आहे. या प्रकरणातील आरोपी निलेंद्र बघेल हा रविवारी त्याचा मामेभाऊ आशीष बिसेन याला दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेला होता. त्यानंतर दोघांनी दारू सुद्धा प्यायली, मात्र त्यानंतर दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद निर्माण झाला. त्याच वादातून निलेंद्रने आशिषची हत्या केली. दहावी हत्या : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगर येथे जावयाने स्वतःच मेहुण्याची हत्या केली. जयकिशन शाम जानवकर असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या संपत्तीच्या वादातून त्याच्याच जवायने केली आहे. नितेश सोनवणे असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - Solapur Crime : परभणी अन् सोलापूर पोलिसांमुळे दरोडा अन् घरफोड्या उघडकीस; 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Last Updated : Apr 1, 2022, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.