ETV Bharat / city

प्रियकराच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; बायकोला अटक

author img

By

Published : Jun 2, 2021, 9:23 AM IST

Updated : Jun 2, 2021, 3:16 PM IST

प्रियकराच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा
प्रियकराच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा

गेल्या काही दिवसापासून रहीम हा गायब असल्याची तक्रार त्याच्या मित्राने पोलीस स्थानकांमध्ये नोंदवली होती. त्यानंतर रहीमचा शोध घेण्यात सुरुवात झाली. मात्र, काही केल्या त्याचा शोध लागेना. अखेर रहीमचा भाऊ रईस शेख मुंबईत आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी आला. तपासाअंती बायकोनेच नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले.

मुंबई -दहिसर पूर्व खान कंपाउंड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. रहीम शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर साथीदार फरार आहे.

प्रियकराच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा

प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा संशय

गेल्या काही दिवसापासून रहीम हा गायब असल्याची तक्रार त्याच्या मित्राने पोलीस स्थानकांमध्ये नोंदवली होती. त्यानंतर रहीमचा शोध घेण्यात सुरुवात झाली. मात्र, काही केल्या त्याचा शोध लागेना. अखेर रहीमचा भाऊ रईस शेख मुंबईत आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी आला. तपासाअंती बायकोनेच नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. रहीमला दोन लहान मुलं आहेत. त्यांनी हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे. अखेर पोलिसांनी रहीम याच्या पत्नीला अटक केली आहे. मात्र, तिचा साथीदार प्रियकर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Last Updated :Jun 2, 2021, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.