MH Primary School Opening : जाणून घ्या, कुठे कधी सुरू होणार शाळा

author img

By

Published : Nov 30, 2021, 6:03 PM IST

MH Primary School Opening
जाणून घ्या, कुठे कधी सुरू होणार शाळा ()

परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 1 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत तेथील स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे. दरम्यान काही ठिकाणी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होत आहेत. तर काही ठिकाणी 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिकॉन विषाणू आढळून आला आहे. विदेशात ओमिक्रॉन विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 1 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत तेथील स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे. दरम्यान काही ठिकाणी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होत आहेत. तर काही ठिकाणी 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे. यात पुणे आणि मुंबईतील शाळा 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मुंबईमधील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु -

मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने राज्य सरकारने (State Government) १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईमधील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु केल्या जाणार आहेत. शाळा सुरु करताना पालकांची परवानगी घेणे गरजेचे असल्याने शाळा उशिरा केल्या जाणार आहेत. १५ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विद्यार्थी सहभागी होऊ शकतात अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

हेही वाचा - Mumbai School Reopening : मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

  • पुण्यात १५ डिसेंबरपासून सुरु -

पुणे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटमुळे शाळा सुरू करण्याबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. पुण्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र लहान मुलांचे लसीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून पुण्यात शाळा 15 डिसेंबरनंतर ( Pune School Opening after 15 December ) उघडण्याबाबत त्यावेळी सुचना देऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ( Pune Mayor statement on School Opening ) यांची दिली आहे.

हेही वाचा - Primary Schools reopen : पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून होणार सुरू, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क

  • औरंगाबादेत 10 डिसेंबरपासून -

औरंगाबाद - राज्यात प्राथमिक शाळा ( Primary School Reopen ) 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हायरस ( Corona new Omicron Variant ) येण्याची शक्यता पाहता, औरंगाबाद महानगरपालिकेच्या ( Aurangabad Municipal Corporation ) हद्दीतील शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 डिसेंबर रोजी याबाबत पुढील आढावा बैठक घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - micron Variant Impact : ओमिक्रॉनचा धोका पाहता औरंगाबाद मनपाच्या हद्दीतील शाळा राहणार बंद

  • अमरावती 1 डिसेंबर पासून -

अमरावती - कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष बंद असणाऱ्या प्राथमिक शाळेत बुधवार पासून चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. राज्य शासनाने 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून पाऊस पडलेल्या शाळेत चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.