ETV Bharat / city

CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 4, 2022, 6:51 PM IST

Updated : Jul 4, 2022, 7:18 PM IST

महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी ( to provide relief to the people of Maharashtra) आम्ही पेट्रोलियमवरील व्हॅट कमी करू. (We will reduce VAT on petrol and diesel) केंद्र सरकार कोणत्याही राज्य सरकारसोबत आले की, त्या राज्यात विकासाचा वेग अनेक पटींनी वाढतो. देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठरावानंतर विस्तृत मनोगत मांडताना शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले त्यानंतर झालेल्या पत्रकार परीषदेत बोलताना त्यांनी सांगितलेकी, अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला दिसासा देण्यासाठी आम्ही पण पेट्रोल डिझेल वरचा व्हॅट कमी करण्या संदर्भात निर्णय घेउ.

विकासकामांना ब्रेक लावणार नाही : घाईगडबडीत मजूर झालेले प्रस्ताव स्थगित करत आहोत.आमचे सरकार नियमानुसार काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात नवे सरकार आल्यापासून आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला ब्रेक लावण्याचा धडाका लावला आहे का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बोलताना त्यांनी सांगीतले की, सरकारने काही निर्णय घेत विकास आराखड्यांना ब्रेक लावला आहे. एक एप्रिलनंतरच्या विकास आराखड्यांना या सरकारने स्थगिती दिली आहे.

  • We will cut VAT on petroleum to provide relief to the people of Maharashtra... When the Central govt comes with any state govt, the speed of development increases multifold in that state. We will surely get benefit from Devendra Fadnavis's experience: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/dU5yGxisyM

    — ANI (@ANI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय घेण्याचा वेग मी मागील सरकारमध्ये पाहिला आहे. त्यानी प्रलंबित काम पूर्ण केले. या सरकारमध्येही आम्ही सर्व प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, मग तो मेट्रो प्रकल्प असो किंवा समृद्धी महामार्ग, हे सरकार जनतेच्या आदेशाचे आहे जे काही कारणांमुळे 2.5 वर्षांपूर्वी स्थापन होऊ शकले नाही. आज आमच्याकडे 50 (शिवसेना) आणि 115 (भाजप) आमदार आहेत आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ अशी माहितीही शिंदे यांनी दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती

व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच पाहू. ते (उद्धव ठाकरे गट) नियमित कोर्टात जात आहेत आजही ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. भरत गोगावले हे आमचे प्रतोद आहेत आणि मी स्वतः विधीमंडळ पक्षाचा नेता आहे. आमच्या व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आज आमच्या बाजूने मतदान करणारे सर्व आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देतील... शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण ते जे काही बोलतात त्याच्या अगदी उलट आहे. त्यामुळे आम्ही शासनाची २.५ वर्षे पूर्ण करू; पुढच्या वेळी 200 आमदार निवडुन आणु यात 100 आमचे आणि 100 भाजपचे असतील असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

  • This govt is of people's mandate which couldn't be formed 2.5 yrs back due to some reasons. We have today 50 (Shiv Sena) & 115 (BJP) MLAs & we will take decisions in the interest of the people of Maharashtra: Maharashtra CM Eknath Shinde, in a presser with Dy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/9XnDh7R667

    — ANI (@ANI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमरावती प्रकरणात शोध जारी : अमरावती येथे उमेश कोल्हे यांच्या झालेल्या हत्तीची चौकशी करण्यात येत असून याबाबत संबंधितांना अटक करून कठोर कारवाई केली जाईल तशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नाणार येथील प्रकल्प बाबत लोकांशी बोलून लोकांना गरज असलेल्या प्रकल्पाची निर्मिती करणार आहोत. तसेच वशिष्ठ नदी यावर्षीही तुडुंब भरून वाहत असून अद्यापही धोक्याची पातळी गाठलेली नाही मात्र आम्ही सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली असून परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकार पूर्ण बहुमतावर जिंकले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज 164 विरुद्ध 99 इतक्या मोठ्या फरकाने विश्वास मत जिंकले आहे त्यामुळे हे सरकार पूर्ण बहुमतावर जिंकले आहे काही लोक सातत्याने न्यायालयात जात आहे मात्र त्याचा काहीही फायदा होणार नाही राज्यात आता शिवसेना भाजपा युतीचे सरकार विराजमान झाले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.



हेही वाचा : CM Eknath Shinde Emotional : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भावूक

Last Updated : Jul 4, 2022, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.