सेवाग्राम येथून होणार हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाचा गांधी जयंतीपासून शुभारंभ - सुधीर मुनगंटीवार

author img

By

Published : Sep 19, 2022, 5:54 PM IST

सेवाग्राम येथून होणार हॅलो ऐवजी वंदे मातरम

जनाजनात आणि मनामनात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (instead of Hello from Gandhi Jayanti) त्याच दिवशी 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' अभियानाचा (Vande Mataram campaign will launched from Sevagram) शुभारंभ करण्यात येईल. या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठक नंतर ते बोलत होते.

मुंबई - राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Vande Mataram campaign will launched from Sevagram) सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवाग्राम, वर्धा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याच दिवशी 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' (instead of Hello from Gandhi Jayanti) अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. त्याचा समारोप यावेळी होणार आहे. त्याबाबत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस स्थानिक आमदार पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धा जिल्हयाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे,पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.



हॅलो ऐवजी वंदे मातरम अभियानाचा शुभारंभ - आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीनेच राज्यातील जनतेने यापुढे एकमेंकाशी संवाद साधताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे. आलेआहे. या कार्यक्रमास उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.