ETV Bharat / city

Urban Naxalism case : शहरी नक्षलवाद प्रकरण; आईला भेटण्याचे कारण देत प्रा. आनंद तेलतुंबडेंचा नव्यानं जामीन अर्ज

author img

By

Published : Feb 11, 2022, 12:34 PM IST

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी ( Anand Teltumbde Urban Naxalism case ) पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. आनंद तेलतुंबडेंना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तेलतुंबडे हे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत.

Anand Teltumbde
आनंद तेलतुंबडे

मुंबई - शहरी नक्षलवाद आणि माओवाद्यांशी संबंधाप्रकरणी अटक करण्यात आलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी ( Anand Teltumbde file bail application in Mumbai High Court ) मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. आजारी असलेल्या 92 वर्षीय आईला भेटण्यासाठी अंतरिम जामीन तेलतुंबडे यांनी दाखल केला आहे. यावर न्यायमूर्ती एसएस शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला भाऊ आणि जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूचं कारण देत प्रा. आनंद तेलतुंबडेंनी जामीन अर्ज दाखल केला होता. गडचिरोलीतील कोर्चीमध्ये स्पेशल फोर्ससोबत झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश आहे.

31 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018 यादरम्यान भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. आनंद तेलतुंबडेंना मागील वर्षी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तेलतुंबडे हे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत.

हेही वाचा - Urban Naxalism case : प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला; आईच्या सांत्वनाकरिता केला होता अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.