ETV Bharat / city

Narayan Rane : 'उद्धव ठाकरे खोटारडे आणि कपटी'; नारायण राणेंनी सोडले टीकास्त्र

author img

By

Published : Jul 26, 2022, 7:44 PM IST

Updated : Jul 26, 2022, 10:29 PM IST

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो व नाव न घेता लढा, असे आव्हान बंडखोरांना केले होते. त्यावर वारसा हा रक्ताने नव्हे विचाराने मिळत असतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचे ऐकले नाही. पण बाळासाहेबांचे ऐकले, असे उत्तर नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी दिले आहे.

Shiv sena chief Uddhav Thackeray
नारायण राणे

नवी दिल्ली - अडीच वर्षात काय दिवे लावले? असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, अडीच वर्षात जनतेसाठी काहीच केलं नाही. अडीच वर्षात मराठी माणसासाठी काहीच केले नाही. मातोश्रीबाहेरील कुणालाच प्रेम आणि विश्वास दिलं नाही. यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी दिलं...प्रेम, विश्वास, दु:खात समरस शिंदे झाले. उद्धव ठाकरे ( Shiv sena Chief Uddhav Thackeray ) खोटारडे आणि कपटी आहेत. अशी जहरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला सांगितली, संजय राऊत जोकर आहे, पत्रकार नाही. संजय राऊत यांची राज्यभर चेष्टा होतेय. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

नारायण राणे यांची पत्रकार परिषदेतील प्रतिक्रिया

नारायण राणे यांचे प्रत्युत्तर - उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो व नाव न घेता लढा, असे आव्हान बंडखोरांना केले होते. त्यावर वारसा हा रक्ताने नव्हे विचाराने मिळत असतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचे ऐकले नाही. पण बाळासाहेबांचे ऐकले, असे उत्तर नारायण राणे यांनी दिले आहे. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

'जळफळाट आणि केविलवाणी व्यथा' - सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानं उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. या व्यक्तीला मी 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेष आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

फक्त डझनभर आमदार राहिले आहेत - काय अवस्था झाली आहे शिवसेनेची? एक डझन आमदार आणि पाव डझन खासदार राहिले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही दंगलीमध्ये नव्हते, त्यांनी कुणालाही मदत केली नाही. आता शाखा शाखात जाऊन जनतेला साद घालतायत. पुढच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पाच आकडा सुद्धा दिसणार नाही.

हेही वाचा - Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, बाळासाहेब ठाकरे....

नारायण राणेंची संजय राऊतांवरही निशाणा - संजय राऊतने पहिले काम केलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करणे. आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत मनातून खूश आहे की मी विजयी ठरलो. संजय राऊत आजून किती उद्धव ठाकरे यांचे कपडे उतराणार आहेस. माझ्या गुरूने, पवारसाहेबांनी दिलेले काम करण्यात मी यशस्वी ठरलो, असा टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना भडकवण्याचं काम करतायत. संजय राऊत हे ठाकरेंना आपल्या तालावर नाचवतायत. सत्ता गेल्याने संजय राऊत मनातून खूश आहेत. पवारांच्या सूचनांप्रमाणे राऊतांनी काम फत्ते केले.

हेही वाचा - Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची फडणवीसांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'मी फिक्स मॅच बघतच नाही'

Last Updated :Jul 26, 2022, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.