ETV Bharat / city

Yakub Memon Grave Controversy याकूब मेमनच्या स्मारकासाठी अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनची धमकी

author img

By

Published : Sep 9, 2022, 1:02 PM IST

Updated : Sep 9, 2022, 3:59 PM IST

याकूब मेमनचं स्मारक करण्यासाठी कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित सदस्याला अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनने धमकी don Tiger Memon threatens Kabrastan Trust for Monument Yakub Memon दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रस्टच्या सदस्याला धमकी आल्याचे सदस्याकडून पोलिसांत माहिती दिली आहे.

Yakub Memon Grave Controversy
Yakub Memon Grave Controversy

मुंबई - याकूब मेमन कबरीवर रोषणाई करण्याचा वाद शांत होत असतानाच आता या संदर्भातील एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. याकूब मेमनचं स्मारक करण्यासाठी कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित सदस्याला अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनने धमकी don Tiger Memon threatens Kabrastan Trust for Monument Yakub Memon दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रस्टच्या सदस्याला धमकी आल्याचे सदस्याकडून पोलिसांत माहिती दिली आहे. ट्रस्टशी संबंधित नवांगी नावाच्या व्यक्तीला ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई करण्यात आल्याचे उघड झाल्याने गुरुवारी वाद निर्माण झाला होता.

Yakub Memon Grave Controversy
याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई करण्यात आल्यावरून वाद निर्माण झाला होता

मुंबईत झालेल्या 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरील सुशोभीकरणावरून सुरू असलेल्या वादात नवीन वळण आले आहे. बडा कबरस्तान संस्थेच्या माजी सदस्याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार टायगर मेमनची यापूर्वी अनेकदा धमकी आल्याची माहिती मुंबई पोलिसांना माजी सदस्याने दिली आहे. याकूब मेमनच्या ज्या जागी कबर आहे ती जागा असलेल्या सदस्याला धमकी देण्यात आली होती.


याकुब मेमनचा भाऊ टायगर मेमनने 2021 साली ती कबर विकत घेण्यासाठी धमकी दिली होती, अशी माहिती बडा कब्रस्तानच्या दोन विश्वस्तांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. माजी विश्वस्त जलील नवरोन यांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये टायगर मेमन यांच्या नावावर असलेली ती जमीन मेमन यांच्या नावावर करण्याकरिता धमकी दिली होती. तसेच त्यांना ट्रस्टमधून आरोप लावून काढण्याची धमकीगी देण्यात आली होती. त्यानंतर तसेच झाले. या दोन्हीही सदस्यांना त्यानंतर काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.


याकूब मेमनची ज्या ठिकाणी कबर करण्यात आली त्या ठिकाणी मोठे स्मारक बांधण्याकरिता ही जमीन मागितली असल्याचे माजी सदस्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


बडा कब्रस्तानचे माजी विश्वस्त परवेज सरकारे आणि जलील नवरोन यांनी सांगितले की, मेमन परिवार याकुब मेमनची कबर सुशोभित करण्यासाठी आग्रही होता. त्यासाठी तीन इतर कबर विकत घेण्याचाही प्रयत्न झाला होता, परंतु या दोन्ही विश्वस्तांनी मेमन कुटुंबीयांना साफ नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानात असलेल्या याकुब मेमनचा भाऊक टायगर मेमनने या विश्वस्तांना धमकी दिली होती. टायगर मेमनने धमकी देत ही कबर मोठी आणि सुशोभित करण्याची धमकीही दिली होती, परंतु या विश्वस्तांनी नकार देत पोलिसांकडे तक्रार केली होती.



याकुब मेमनच्या कबरीवरील सुशोभीकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे सुशोभीकरण झाले होते, असा आरोप भाजपने केला आहे. तर याकुब मेमनला ओसामा बिन लादेन सारखे समुद्रात का नाही दफन केले, याकुब मेमनला मुंबईत दफन करण्याची परवानगी कोणत्या सरकारने दिली होती, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई पोलिसांनी हटविली रोषणाई मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन Mumbai Blast Convict Yakub Memon ज्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमनच्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले आणि गुरुवारी त्यावर एलईडी लाईटने विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर काल मुंबई पोलिसांचे पथक बडा कब्रस्तान येथे दाखल झाले आणि बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली LED lights removed from Yakub Memon grave होती.

याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई करण्यात आल्यावरून वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी ती रोषणाई काढून टाकली





याकूब मेमन कोण आहे ? 12 मार्च 1993 ला मुंबई नेहमीप्रमाणे घड्याळाच्या काट्यावर धावत होती. पण अचानक एका पाठोपाठ एक 12 स्फोट झाले आणि मुंबई थांबली. हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. दहशतवाद्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. या जखमा अजूनही मुंबईकरांच्या मनात ओल्या आहेत. हा दिवस आठवताच मुंबईकरच नाही तर अवघ्या देशवासियांच्या अंगावर काटा येतो. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानं अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशेहून अधिकजण या स्फोटात जखमी झाले होते. या भयाण हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. अनेक निष्पाप बळी गेले.

मुंबई हादरवणाऱ्या या हल्ल्यांमागचा सुत्रधार होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या हल्ल्यांमागे दाऊदचा संबंध असल्याचं समोर आलं. पण याप्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले. त्यामध्ये एक कुटुंब होतं. ते म्हणजे मेमन कुटुंब. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचं कुटुंब. टायगर मेमन आणि याकूब मेमन दोघं भाऊ. यांचा या बॉम्बस्फोटाच्या कटामागे हात होता. बॉम्बस्फोटानंतर हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह फरार झालं.

12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला, त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले.

Last Updated :Sep 9, 2022, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.