ETV Bharat / city

Shiv Sena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे 'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियानाला समर्थन ; पुरोगामी चळवळीसोबत जवळीक वाढली

author img

By

Published : Oct 13, 2022, 10:09 AM IST

Shiv Sena Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचे 'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियानाला समर्थन

'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियान देशभर सुरू (Quit Hate Save Constitution campaign) आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नुकतीच भेट (Thackeray Support to Quit Hate Save Constitution) झाली.

मुंबई :. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी यासारख्या एजन्सीच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत देशातील सर्व विरोधी पक्ष एक होत आहेत. 'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियान (Quit Hate Save Constitution campaign) देशभर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नुकतीच भेट Thackeray Support to Quit Hate Save Constitution झाली.

देशात हेट स्पीच - याबाबत पुरोगामी चळवळीतील नेते फिरोज मिठीबोरवाला यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करताना भेटीबाबत सांगितले - देशात हेट स्पीच अर्थात एका समूहाला लक्ष करीत द्वेष पूर्ण भावना भडकवल्या जातात. हे कृत्य राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. अशा द्वेषाने दोन धर्म किंवा समूहात सौहार्दाचे नाते बिघडते. यातून समाजात अशांतता माजते. याचा फटका मेहनत करणारे श्रमिक, सामान्य जनता आणि महिला वर्गाला बसतो. जनतेचे मूलभूत जगण्याचे प्रश्न या द्वेष विधानाने बाजूला पडतात. मात्र केंद्र कीवा राज्यशासन यावर अंकुश ठेवत नाही. त्यामुळेच एक समूह दुसऱ्या समूहाच्या जीवावर उठतो इतका द्वेष पसरतो, असे देशातील लोकशाही आणि गांधीवादी तसेच डाव्या समाजवादी पक्ष संघटनांना वाटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संविधान बचाओ अभियानाला उद्धव ठाकरे यानी समर्थन दिल्याचं त्यांनी नमूद (Shiv Sena Uddhav Thackeray Support) केलं.


उद्धव ठाकरेंचं अश्वासन - या भेटीत उद्धव ठाकरे आणि तुषार गांधी (Uddhav Thackeray and Tushar Gandhi meeting) यांच्यात पंचेचाळीस मिनिटे चर्चा झाली. तुषार गांधी यांनी विशद केलं की, देशभर जनांदोलनाचा समन्वय करत संविधान बचाओ अभियान सुरू असल्याची कल्पना उद्धव ठाकरे यांना दिली. तसेच 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व मार्क्सवादी, समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारांच्या संघटना व शिव सेना सर्व एकत्र येत संविधान बचाओचा नारा दिला होता. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे - ही यात्रा महाराष्ट्र राज्यात येणार असून दादरच्या चैत्यभूमी येथे त्या यात्रेची सांगता होणार आहे. याची संपूर्ण कल्पना तुषार गांधी उद्धव ठाकरे यांना दिली. ह्या यात्रेस शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Support) यांनी तुषार गांधी आश्वस्त केल्याचं त्यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना माहिती दिली.


या यात्रेत विविध संघटना आहेत. आरे बचाओ आंदोलन, घर बचाओ घर बचाओ, भारत बचाओ आंदोलन, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी, सीएसएसएस, युसूफ मेहरली केंद्र, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, बॉम्बे कॅथलिक सभा, विद्यार्थी भारती होते, अश्या अनेक संघटना मिळून ही प्रक्रिया सुरू केली आता तिला वेग आला आहे. असे देखील फिरोज यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.