ETV Bharat / city

XE Variant In Mumbai : एक्सई व्हेरियंटबाबत 'त्या' अहवालानंतर सत्यता समोर येणार

author img

By

Published : Apr 8, 2022, 6:02 PM IST

XE Variant
XE Variant

मुंबईत कोरोनाचा नवा एक्सई व्हेरियंट आढळल्याचे समोर आले ( First Case XE Variant In Mumbai ) होते. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने याला दुजोरा दिला ( Union Health Minister Denies It ) नाही. यामुळे संबंधित डाटा आयएनएसएसीओजी व एनआयबीजीकडे पाठवण्यात आला आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेने केलेल्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून ( Genome Sequencing ) जगभरात सध्या वेगाने पसरणाऱ्या मुंबईत एक्सई या व्हेरियंटचा रुग्ण आढळून ( First Case XE Variant In Mumbai ) आल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने एक्सई व्हेरियंट आढळून आला नसल्याचे म्हटले ( Union Health Minister Denies It ) आहे. यामुळे संबंधित सिक्वेन्सिंग डाटा आयएनएसएसीओजी व एनआयबीजीकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालाकडे आता पालिकेचे लक्ष लागले असून, त्या अहवालानंतरच एक्सई विषाणूबाबतची सत्यता समोर येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत एक्सई चा रुग्ण ? - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाच्या सुमारे ८ ते ९ व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार झाला आहे हे वेळीच समोर आल्यास त्याचा प्रसार रोखणे व रुग्णावर उपचार करणे सोपे जाते. यासाठी पालिकेने ऑगस्ट २०२१ पासून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या सुरू केल्या. चाचण्यांच्या अकराव्या फेरीत ९९.१३ टक्के रुग्ण ओमायक्रोनाचे, १ रुग्ण केपाचा तर १ रुग्ण एक्सई या व्हेरियंटचा आढळून आला आहे. इंडियन सार्स सीओव्ही २ जिनोमिक कन्सॉर्रीटयम (आयएनएससीओजी) या संस्थेने या रुग्णाचे अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नसल्याचे म्हटले आहे.

जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या - मुंबईमध्ये कोणत्या प्रकारच्या विषाणूचा प्रसार झाला आहे, याची माहिती मिळवण्यासाठी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबमध्ये आतापर्यंत ११ फेऱ्यांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात आल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये एक रुग्ण कोरोनाच्या एक्सई या व्हेरियंटचा आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून विषाणूबाबत जनुकीय माहिती दिली जाते. त्यानुसार ज्या चाचण्या केल्या जातात त्यामधून आढळून आलेल्या व्हेरियंट कोणत्या प्रकारचा आहे हे स्पष्ट होते, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एक्सई व्हेरियंट - ओमायक्रोनच्या बीए १ आणि बीए २ व्हेरियंटमध्ये बदल होऊन एक्सई हा विषाणू तयार झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा व्हेरियंट १२ जानेवारी रोजी आढळून आला होता. जगभरात या व्हेरियंटचे सहाशेहून अधिक रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आतापर्यंत आढळून आलेल्या व्हेरियंटपेक्षा एक्सई हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे.

अहवालातून स्पष्ट होईल - मुंबईत आढळून आलेल्या त्या रुग्णाचा जिनोमिक डाटा पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेने इंडियन सार्स सीओव्ही २ जीनोमिक्स कंसोर्टियम (आयएनएससीओजी) व त्यांनी पश्चिम बंगाल कल्याणी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स (एनआयबीएमजी) संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालातून हा रुग्ण एक्सई व्हेरियंटने बाधित होता का हे स्पष्ट होणार असल्याचे पालिकेचे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Silver Oak Attack : शंभराहून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.