Maharashtra Political Crisis: रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्याचे दत्तात्रय भरणेंना निवेदन

author img

By

Published : Jun 28, 2022, 11:00 AM IST

ADHIKARI TRANSFERS

राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने (Maharashtra State Gazetted Officers Federation ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे ( Statement to cm uddhav thackeray and dattatray bharane ) केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित बदल्या करण्यास मान्यता दिली असतानाही प्रशासनाकडून अद्याप तसा आदेश काढला नसल्याने पेच निर्माण झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

मुंबई - राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने (Maharashtra State Gazetted Officers Federation ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे( Statement to cm uddhav thackeray and dattatray bharane ) केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित बदल्या करण्यास मान्यता दिली असतानाही प्रशासनाकडून अद्याप तसा आदेश काढला नसल्याने पेच निर्माण झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

करोनामुळे रखडल्या बदल्या - २०२०-२१ मधील नियमित बदल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास रद्द ( transfer canceled due to corona outbreak ) करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या वर्षातही कमी अधिक प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे शंभर टक्के बदल्या न करता अगदी काही प्रमाणातच बदल्या करण्यात आल्या होत्या. यावर्षी गोल्या दोन वर्षांच्या तुलनेत करोना साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १००% नियमित बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

३० जून पर्यंत बदल्या कराव्यात! - साधारण दरवर्षी ३१ मे पर्यंत बदल्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात मुंबईत होत असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या कौटुंबिक व आरोग्यविषयक समस्या यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी अधिकाऱ्यांनी बदलीच्या नवीन ठिकाणी स्थिरावण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन, आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील नियमित व प्रशासकीय बदल्या ३० जून अखेरपर्यंत प्राधान्याने करण्यात याव्यात, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे आणि महासंघाचे सल्लागार ग दि कुलथे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सध्या राज्यात राजकीय अस्थिरता ( Maharashtra Political Crisis ) पहायला मिळत आहे. महविकास आघाडीमधील महत्तवाचा घटकपक्ष असेलल्या शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार फूटले ( Shiv Senas ministers and MLAs split ) आहेत. त्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागले आहे. अशात राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन कसे होईल हे पहाव लागेल.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांपैकी २० आमदार आमच्या संपर्कात- अनिल देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.