ETV Bharat / city

#MaharashtraBreaking live : अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ.. दोन्ही खासगी सचिवांना ईडीने घेतले ताब्यात

author img

By

Published : Jun 25, 2021, 8:49 AM IST

Updated : Jun 25, 2021, 10:20 PM IST

Maharashtra
महाराष्ट्र ब्रेकिंग

22:19 June 25

पदोन्नती आरक्षणाच्या समितीला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई - मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. या समितीला अभ्यासाकरिता अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत या समितीला मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जाहीर केला.

राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार कोट्यातील रिक्त जागा भरण्यास हिरवा कंदील दर्शवला. महाविकास आघाडी सरकारवर यावरून टीकेची झोड उठली. काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही सरकारविरोधात दंड थोपटले. राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी 22 मार्च 2021 रोजी समिती नेमली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास करत आहे. मात्र, यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याने राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

19:53 June 25

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, राज्याला डेल्टा व्हेरिएंटचा धोका अधिक

मुंबई - महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही राज्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राज्य सरकारडून नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली असून सर्व जिल्ह्यात आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

19:07 June 25

अनिल देशमुखांच्या दोन्ही खासगी सचिवांना ईडीने घेतले ताब्यात

नागपूर - आज सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या आणि मुंबईच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तसेच यावेळी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोन्ही खासगी सचिवांना ईडीकडून तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

17:37 June 25

पंढरीत राज्य सरकारविरोधात भाजपचे उद्या चक्काजाम आंदोलन

पंढरपूर - महाविकास आघाडी सरकारकडून मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण, मागासवर्गीयांचे नोकरीमधील आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने 26 जुलै रोजी पंढरपुरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांनी दिली आहे.

17:07 June 25

कॉपीराईट संदर्भात कंगना रणौतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

मुंबई - कंगना रणौतने हायकोर्टात दाखल केलेल्या विविध याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. कॉपी राईटचा मुद्दा तसेच पासपोर्ट नूतनीकरणासंदर्भात कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  'दिड्डा - वॉरियर क्वीन ऑफ कश्मीर' या विषयावर सिनेमा काढणार ही केवळ घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यासाठी कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल कसा काय होऊ शकतो? असा सवाल कंगनाकडून मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.  

17:06 June 25

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ.. स्वीय सहायक ईडीकडून ताब्यात

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचे पीए कुंदन शिंदे यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रीग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने आज छापा मारला आहे.  

16:48 June 25

COVID 19 vaccine : सीरमकडून अमेरिकेच्या कोवोवॅक्सचे उत्पादन सुरू, अदर पुनावाला यांची घोषणा

पुणे- सीरमने लस उत्पादनात शुक्रवारी नवा मैलाचा दगड गाठला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीरम) पुण्यातील उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लस कोवोवॅक्सचे उत्पादन शुक्रवारपासून सुरू केले आहे. ही लस अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केली आहे. कोवोवॅक्सचे उत्पादन सुरू झाल्याची घोषणा सिरमने ट्विटर केली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले, की कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचचे आमच्या पुण्यातील प्रकल्पामधून उत्पादन सुरू झाले आहे.

16:37 June 25

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा आणि धमकीचा ईमेल पाठवणा-या शैलेश शिंदेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आपल्या जुळ्या मुलांना शाळा त्रास देते, यावर न्याय मिळावा म्हणून अनेकदा मेल केले, मात्र त्याचे उत्तर न आल्याने धमकीचा मेल केल्याची कबूली आरोपीने दिली आहे. कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका केली.

16:37 June 25

संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल करणा-या महिलेच्या जामीन अर्जावर थेट सुनावणी नाही - हायकोर्ट

मुंबई - संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल करणा-या महिलेचा जामीन अर्ज थेट सुनावणीस घेता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. याचिकाकर्त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाद मागण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. बोगस डिग्री प्रकरणात अटकेत असलेल्या स्वप्ना पाटकर यांचा जामीन अर्ज दंडाधिकारी कोर्टाने फेटाळला होता. त्या निर्णयाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. स्वप्ना पाटकर यांना सध्या 3 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटकर यांच्यावतीने ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टाने ताताडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. बोगस डिग्रीच्या आरोपात अटक झालेल्या प्रकरणात संजय राऊत यांना प्रतिवादी केलेले नाही, मग तक्रार कुणाच्यातरी दबावाने झाल्याचा आरोप कसा करताय? असा सवाल हायकोर्टाने केला आहे.  स्वप्ना पाटकर यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला सोमवारपर्यंत यासंदर्भात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश  दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार पाटकर यांच्या जामीन अर्जावर वेळ काढणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो असे हायकोर्टाने म्हटले आहे.

16:04 June 25

ट्विटरकडून रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट तात्पुरते बंद

नवी दिल्ली - नवीन सोशल मीडियाच्या कायद्यावरून ट्विटर व केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले असताना त्यात आज आणखी भर पडली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना तासभर ट्विटरचे अकाउंट लॉग इन करता आले नाही. त्यावरून केंद्रीय मंत्री यांनी ट्विटरकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याची टीका केली आहे.

15:11 June 25

मुंबईत सात ठिकाणी झालेल्या बोगस लसीकरणाचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई - मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की मुंबई विभागात विविध ठिकाणी बोगस लसीकरणाच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत बोगस लसीकरणाविरोधात 7 गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस लसीकरणाचा पर्दाफाश करत डॉक्टर पती-पत्नीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांदिवलीमध्ये 8 आरोपींना अटक केली आहे.  शिवम हॉस्पिटलमधून खोटे लसीकरण पुरविले आहे. कांदिवली प्रकरणात 220 नागरिकांचे जबाव नोंदवले आहेत. बोरिवलीत 555 नागरिकांचे बोगस लसीकरण केले आहे. बोगस लसीकरणाचे रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आले आहे. 9 ठिकाणी बोगस लसीकरण झाले आहे.  

14:57 June 25

डेल्टा प्लस विषाणूमुळे घाबरून जाऊ नका, सरकार परिस्थितीवर लक्ष - राजेश टोपे

जालना - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जनतेला आवाहन केले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस विषाणूमुळे रत्नागिरीत एक बळी गेला आहे. तरी जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 

14:56 June 25

डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी

रत्नागिरी - जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील येथील आहे. मृत महिला वय हे 80 वर्ष आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. 

12:53 June 25

मुंबई - मुंबई विभागात विविध ठिकाणी बोगस लसीकरणाचा घटना घडल्या आहे. आतपर्यत  बोगस लसकीरणाविरोधात 7 गुन्हे दाखल झाले आहे. बोगस लसकीरणाचा पर्दाफाश करत डॉक्टर पती-पत्नीसह 7 आरोपीना केली अटक केली आहे, अशी माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांची दिली.

12:46 June 25

कंगनाचा वांद्रे न्यायालयात दिलासा मिळण्यासाठी अर्ज; जावेद अख्तरांनी केला होता मानहानीचा दावा

अर्णव गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगना राणौतने लेखक जावेद अख्तर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला होता. त्या प्रकरणात दिलासा मिळावा यासाठी कंगनाने आता वांद्रे मॅजिस्ट्रेट न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

12:30 June 25

अनिल देशमुखांच्या घरावर छापेमारी करून ईडी काय हस्तगत करणार - सावंत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी केली जात आहे. मात्र या कारवाईतून ईडी काय साध्य करणार आहे. जेव्हा की परमबीरसिंह आणि वाझे यांनी पैसे मागितल्याचा आरोप केला आहे दिले आहे असे म्हटले नाही, असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रवक्ते ईडीच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आपली स्वायत्तता मोदी सरकारपुढे शरण केल्या आहेत.  केंद्राकडून त्यांचा विरोधकांविरोधात राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा छळ करून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा मोदी सरकारच्या या प्रकाराला तिन्ही पक्षांनी विरोध करायला हवाच लोकशाहीचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.  

12:13 June 25

इकबाल कासकर भिवंडी न्यायालयात हजर; एनसीबी घेणार ताबा

11:52 June 25

अनिल देशमुखांच्या मुंबईच्या घरावरही ईडीचा छापा

ईडीकडून अनिल देशमुख यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी या शासकीयच बंगल्यावरही ईडीचा छापा पडला आहे. अनिल देशमुख यांच्या आधीच्या शासकीय निवासस्थानीही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या त्याच निवासस्थानी वास्तव्यात आहेत.

11:51 June 25

यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे गुजरात मधून अटक

यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे याला ठाणे गुन्हे शाखेने गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. दिलीप घेवारे हा नगर रचनाकार अधिकारी आहे. त्याने केलेला हजारो कोटींचा घोटाळा गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता.

11:48 June 25

गोंदिया जिल्ह्यात नवनिर्माण इमारतीमध्ये दोन मजुरांची निर्घृण हत्या

11:42 June 25

इकबाल कासकरला एनसीबीने आणले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात

मुंबई- कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याला ईडीने आज मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. कोरोना टेस्टिंग आणि इतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कासकरला भिवंडी कोर्टात हजर केले जाणार आहे.  त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर एनसीबी कासकरला अटक करून अमली पदार्थ व्यापाराबाबत चौकशी करणार आहे. 

एनसीबीने कासकरला ठाणे जेलमधून मुंबईत आणले आहे. यावेळी त्यांच्यासोत  १ पोलीस व्हॅन, १ अॅम्बयुलन्स आणि दोन पोलीस जीप असा ताफा असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्याने दिली.

11:37 June 25

छगन भुजबळांसारखीच अनिल देशमुख यांची अवस्था होणार - भाजपा नेते किरीट सोमय्या

अनिल देशमुखांच्या घरी आज ईडीचे छापे पडलेत.  काही दिवसांनी त्यांची रवानगी जेलमध्ये होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मध्ये वळविला आहे. छगन भुजबळ यांना अशाच प्रकारच्या घोटाळ्यामुळे ३ वर्ष जेल मध्ये राहावे लागले होते. आता देशमुख आणि काही दिवसांनी अनिल परब यांचीही अशीच अवस्था होणार असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली.

11:34 June 25

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

साधारण 8.20 वाजताच्या सुमारास ईडीचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले. याठिकाणी crpf महिला बटालियन बाहेर तैनात करण्यात आल्या आहेत,

घरातील सदस्यांना बाहेर येण्यास मनाई आहे, यात काही अधिकारी सुद्धा घरात असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख घऱात नसल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे नेमकी चौकशी कोणाची केली जात आहे, याला महत्व दिले जात आहे.

10:16 June 25

कोकण किनारपट्टी भागात पावसाचा इशारा

समुद्र किनारपट्टी भागातील पालघर, डहाणू, शाहपूर, मुरबाड, रोहा, अलिबाग, मोडकसागर आणि रत्नागिरी, दापोली, दक्षिण कोकणात ढगांची दाटी दिसून येत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

10:10 June 25

ईडी आणि सीबीआय या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत का- संजय राऊत

ED आणि CBI या संस्थ्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत का? जर तपास करायचा असेल तर राम जन्मभूमीच्या जमीन खरेदी संबंधी अयोध्येचे महापौर आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करणे गरजेचे आहे आणि हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीने हा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. सातत्याने महाराष्ट्र आणि बंगाल मधील नेत्यांना ED आणि CBI त्रास देत आहे. त्याप्रमाणेच प्रताप सरनाईक यांना सुद्धा मानसिक त्रास दिला गेला असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

09:58 June 25

मुंबईच्या फोर्ट विभागातील शहिद भगतसिंग मार्गावरील अफसरा इमारतीमधील शौचालयाचा भाग कोसळला

मुंबईच्या फोर्ट विभागातील शहीद भगतसिंग मार्गावरील अफसरा इमारतीमधील शौचालयाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत काही लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप कोणी जखमी नसल्याची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. 

09:39 June 25

तिसऱ्या दिवशीही परिचरिकांचे कामबंद आंदोलन सुरूच

तिसऱ्या दिवशीही परिचरिकांचे कामबंद आंदोलन सुरूच; मेयो, मेडिकल मधील व्यवस्था कोलमडली..अनेक ऑपरेशन पुढे ढकलण्यात आली

विविध मागण्यांसाठी परिचाराकांनी(नर्स) सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.  

परिचारीकांच्या संपामुळे नागपूरातील मेयो, मेडीकल आणि सुपरस्पेशालिटी हॅास्पीटलमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.  

राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा या आंदोलन परिचरिकांनी घेतला आहे

09:38 June 25

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीने छापा टाकला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान देशमुख यांच्या परबीरसिंह यांच्या आरोप प्रकरणात ईडीने गुरुवारी डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंद करून घेतला आहे.   

09:07 June 25

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज लातूर, उस्मानाबाद दौऱ्यावर

राष्ट्रवादीच्या वतीने परिसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद, औसा, लातूर, निलंगा येथील कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

09:06 June 25

आमदार निलेश लंके वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आमदार निलेश लंके यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

08:50 June 25

राज्यात गुरुवारी 9844 कोरोना रुग्णांची भर पडली असून 197 मृत्यू झाला आहे. तर तब्बल  9371 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत

06:05 June 25

आमदार निलेश लंके वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला, कोरोना काळात व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

Last Updated : Jun 25, 2021, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.