ETV Bharat / city

सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

author img

By

Published : Jun 30, 2021, 7:35 AM IST

Updated : Jun 30, 2021, 8:36 PM IST

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING

20:34 June 30

सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर - सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. आज सकाळी आमदार पडळकर यांनी शरद पवार यांच्यार जोरदार टीका केली होती.  

20:24 June 30

औरंगाबादेत लष्करी जवानाची पोलिसांना मारहाण

औरंगाबाद - लष्करी जवानाने पोलिसांना मारहाण केल्याची घटना औरंगाबाद शहरातील नागरनाका भागात घडली आहे. पोलिसांनी गाडी थांबवताच लष्करी जवान असल्याचे सांगत पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. मारहाणीत सहायक पोलीस निरीक्षक भागीले जखमी झाले आहेत. गाडीवर एनएसजी कमांडो असा उल्लेख आहे. छावणी पोलिसांनी जवानाला ताब्यात घेतले आहे.  

18:41 June 30

वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

मुंबई - वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक सध्या सुरू आहे. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनातील मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मंत्री जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई बैठकीला उपस्थित आहेत. 

17:18 June 30

टीव्ही ग्राहकांना दिलासा

मुंबई - टीव्ही ग्राहकांच्या हितासाठी आणि त्यांना वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य राहण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने १ जानेवारी २०२० रोजी काढलेला आदेश मुंबई हायकोर्टाने वैध ठरवला आहे. एखाद्या वाहिन्या समूहात (बुके) असलेल्या सशुल्क वाहिन्यांची एमआरपी किंमतींची बेरीज ही अशा सुशल्क वाहिन्यांचा समावेश असलेल्या वाहिन्या समूहाच्या किंमतीपेक्षा दीड पटीपेक्षा जास्त असता कामा नये. तसेच एखाद्या वाहिन्या समूहात असलेल्या कोणत्याही सशुल्क वाहिनीची एमआरपी किंमत ही त्या समूहातील सशुल्क वाहिनीच्या सरासरी किंमतीपेक्षा तीन पटींहून अधिक असता कामा नये, अशा दोन अटी ट्रायच्या नव्या आदेशात होत्या. त्या हायकोर्टाने अवैध ठरवून रद्द केल्या आहेत. 

16:55 June 30

आषाढी एकादशीला 400 वारकऱ्यांना मिळणार मंदिरात प्रवेश

पंढरपूर - आषाढी एकादशीला 400 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वारीच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

16:48 June 30

मानखुर्दमध्ये बापानेच तीन मुलांना आईस्क्रीममधून उंदीर मारायचं औषध दिलं; एकाचा मृत्यू

मुंबई - घरगुती भांडणाच्या वादातून राग अनावर झालेल्या बापाने आपल्या तीन मुलांनाच आईस्क्रीममधून उंदीर मारायचं औषध देल्याचा धक्कादयक प्रकार मानखुर्दमध्ये उघडकीस आला आहे. या घटनेत अलिशान मोहम्मद अली अन्सारी या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन मुलं अलीना (वय 7 वर्ष), अरमान (वय 2 वर्ष) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

या घटनेनं मानखुर्द परिसरात एकच खळबळ उ़डाली. मुलांची आई नाजीया हिने दिलेल्या तक्रारीनुसार मानखुर्द पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाचे वडिल आरोपी मोहम्मद अली नौशाद अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

16:13 June 30

नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता पुरस्कार जाहीर

अहमदनगर -  सन २०१७-१८ मधील संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला राज्‍यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्‍कार जाहीर झाला आहे. यात २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या  हस्‍ते गुरुवार १ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने या पुरस्‍काराचे वितरण होणार आहे. केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्‍यवस्‍थापनाचा उत्‍कृष्‍ठ दर्जा व गावात स्‍वच्‍छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्‍यामुळे लोणी बुद्रूक या गावाला हा पुरस्कार मिळाला आहे. 

16:04 June 30

महाविकास आघाडी नेत्यांची उद्या बैठक; विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा

मुंबई - महाविकास आघाडी नेत्यांची उद्या(1 जुलै) बैठक होणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

15:40 June 30

पावसाळी अधिवेशन : काँग्रेसकडून सभागृहात उपस्थित राहण्याबाबत व्हिप जारी

मुंबई - पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असा व्हिप काँग्रेसकडून काढण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी हा व्हिप जारी करण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलैला पावसाळी अधिवेशन होणार आहे. 

15:32 June 30

गोंदियात भारतीय राखीव दलाच्या जवानाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्याचा केला प्रयत्न

गोंदिया - गोंदिया येथील भारतीय राखीव पोलीस दलाच्या (IRB) जवानाने स्वतः वर गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे येत आहे. आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान परसवाडा-बिरसी येथील पोलीस जवान शिपाई मोरे हे कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडलीं. सदर शिपाई हा गंभीररित्या जखमी झाला असून, सकाळी 7 वाजता त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. आत्महत्याचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण काय आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती भारत बटालियन २चे गट क्रमांक १५ चे अधिकारी करत असल्याची माहिती दिली आहे.

15:23 June 30

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि इतर विषयी चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी पत्र लिहून आदित्य ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वेळ न दिल्याने मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

12:35 June 30

मुंबईतील दहीसरमध्ये सराफा व्यापाऱ्याची हत्या; भर दिवसा टाकला दरोडा

मुंबईतील दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराफा व्यापाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. लूट करण्याच्या हेतून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सराफा दुकान लुटण्यासाठी आल्यानंतर लुटीचा डाव फसल्याने त्यांनी मालकावर गोळीबार केला. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

12:08 June 30

नागपुरात कोरोना लसीचा तुटवडा; लसीकरण बंद, मात्र नागरिकांची केंद्रावर गर्दी

नागपुरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र,लसीकरणासाठी केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. यावेळी कोरोनाचा दुसरा डोस घेण्यासाठी एक ८६ वर्षीय कॅन्सरग्रस्त पीडित महिला देखील आली होती 

11:22 June 30

केंद्राच्या सूचनेप्रमाणे डेल्टा प्लसशी दोन हात करण्यास राज्य सरकार सज्ज - नवाब मलिक

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात सतर्क राहण्याचे सूचित केले आहे. ज्याप्रमाणे कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यासाठी राज्यसरकार पूर्णपणे सतर्क आहे. राज्यातील ऑक्सिजन क्षमतेमध्ये वाढ करण्यात येत आहे, नवीन कोरोना रुग्णालये उभारली जात आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.


 

09:44 June 30

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार - संजय राऊत

विरोधक भ्रम पसरवत आहेत, सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट झाली आहे. या भेटीत राज्याशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा झाली, असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

 

09:31 June 30

देशात मंगळवारी कोरोनाचे एकूण ४५ हजार ९५१ बाधित रुग्णांची नोंद

देशात मंगळवारी कोरोनाचे एकूण ४५ हजार ९५१ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात एकूण 5 लाख 37 हजार 064 रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 96.92% इतका झाला आहे.


 

07:44 June 30

2,040 जणांना बनावट दिली गेली बनावट लस; १० जणांना अटक - राजेश टोपे

कोरोना लसीकरणाबाबत ज्या तक्रारी येत आहेत. त्या प्रकरणात पोलिसांच्या अहवालानुसार  2,040 लसीकरण हे बनावट आहे. लसीच्या नावाखाली केवळ सलाईन दिले आहे. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. कोव्हीशील्ड लसीच्या बाटलीमध्ये सलाईन दिले गेले होते, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

07:40 June 30

प्रफुल पटेल यांच्या घरी पक्ष विस्ताराबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा - मलिक

मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक पक्षाचा विस्तार कशा प्रकारे करायचा, विभागाच्या माध्यमातून पुढे कशा प्रकारे काम करायचे यावर चर्चा झाली. तसेच वेगवेगळ्या सरकारी समित्यांवर तिन्ही पक्षांच्या समन्वयातून नियुक्त्या करण्याबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी दिली

07:36 June 30

राज्यात डेल्टा प्लसचे २० रुग्ण; कोरोना लस घेतल्यानंतरही एकाला लागण- राजेश टोपे

राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जवळपास 3,400-4,000 नमुन्यांची तपासणी कऱण्यात आळी आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतरदेखील त्याला डेल्टा प्लसचे संक्रमण झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

06:06 June 30

एटीएम कार्ड क्लोन करून पैशाची चोरी; दोन विदेशी नागरिकांना अटक

मुंबई - एटीएम कार्ड क्लोनिंग करून एकाच्या बँक खात्यातील पैशाची चौरी केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन रोमानियन नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून क्लोन करण्यात आलेली एटीएम कार्ड हस्तगत केले आहे. त्याच बरोबर त्यांच्याकडून एक मायक्रो कॅमेरा क्लोनिंग मशीन देखील जप्त कऱण्यात आले आहे.

Last Updated :Jun 30, 2021, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.