ETV Bharat / city

राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीची पालिकेकडून तपासणी सुरू

author img

By

Published : May 30, 2022, 11:38 AM IST

Updated : May 30, 2022, 1:48 PM IST

BMC at Navneet rana house
राणा दाम्पत्य वास्तव्य इमरात तपास बीएमसी

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ( BMC Investigate building where Rana couple live ) यांनी खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी पालिकेने नोटीस ( Navneet rana house khar notice ) बजावली आहे. त्यानंतर आता पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना नोटीस बजावली असून आज त्याची पाहणी ( Navneet rana house Investigate bmc ) पालिकेकडून करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ( BMC Investigate building where Rana couple live ) यांनी खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी पालिकेने नोटीस ( Navneet rana house khar notice ) बजावली आहे. राणा यांनी या नोटीसला न्यायालयात आव्हान दिले असता त्यांना बांधकाम नियमित करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर आता पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना नोटीस बजावली असून आज त्याची पाहणी ( Navneet rana house Investigate bmc ) पालिकेकडून करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - Bitcoin: बिटकॉइन गेल्या 24 तासांमध्ये एकत्रित

इमारतीला नोटीस, तपासणी सुरू - राणा दाम्पत्याला ( BMC at Navneet rana house ) नोटीस दिल्यानंतर न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यानंतर पालिकेने याच इमारतीमध्ये राहणाऱ्या 8 रहिवाशांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 मे ला घरात येवून पाहणी करून छायाचित्र घेवू. त्यावेळी आपली कागदपत्रे आणि पुरावे उपलब्ध करून द्यावेत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे पालिकेने राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. आज सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पालिकेचे पथक इमारतीमध्ये दाखल झाले असून, प्रत्येक घराची तपासणी करत आहे. यावेळी फोटो व्हिडिओ घेतले जात आहेत. याचा एक अहवाल बनवून नंतर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे.

पालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. राणा हे तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाने त्यांच्य्या घरावर नोटीस बजावली होती. राणा यांच्या घरी पालिकेचे पथक दोन वेळा जाऊन आले. मात्र, ते तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाला त्यांच्या घरात जाता आले नव्हते.

नव्याने नोटीस - ९ मे ला राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना होण्याच्या आधी पालिकेचे पथक त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी घरात झालेल्या बांधकामाची माहिती घेतली. त्यात काही बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे राणा दाम्पत्याला पालिकेने नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचे राणा यांनी पालिकेला कळविले आहे. राणा यांच्या उत्तराने पालिकेचे समाधान झाले नसल्याने नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू अशी नोटीस पालिकेने राणा दाम्पत्याला दिली आहे. त्याला राणा यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला आहे. बीएमसीची नोटीस ( BMC Notice To Rana Home In Khar ) बजावल्यानंतर आता राणा दाम्पत्य आपले बेकायदा बांधकाम लवकरच नियमित करणार आहेत. दिंडोशी न्यायालयाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे.

हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असे आवाहन राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून, ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जमीन मिळाल्यावर राणा दाम्पत्यांनी मीडियाला बाईट दिली. विशेष म्हणजे, कोर्टाने त्यांना मीडियाशी बोलू नये अशी अट घातली होती. कोर्टाने दिलेली अट पाळली नसल्याने राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली. त्यानंतर राणा यांना नोटीस पाठवून त्यांचे यावर म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Stock market: सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; तर निफ्टी 16,578 वर

Last Updated :May 30, 2022, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.