चैन पुलिंगमुळे दोन हजार ३०० लोकल आणि ७०० ट्रेनला लेट मार्क

author img

By

Published : May 12, 2022, 9:02 PM IST

चैन पुलिंग

रेल्वेने उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सतत प्रवाशांकडून अलार्म चैन पुलिंग होत असल्याने एप्रिल महिन्यात दोन हजार ३०० लोकल आणि ७०० ट्रेनला लेट मार्क लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागले आहे. साखळी ओढण्याच्या (चैन पुलिंग) घटना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

मुंबई -रेल्वेने उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सतत प्रवाशांकडून अलार्म चैन पुलिंग होत असल्याने एप्रिल महिन्यात दोन हजार ३०० लोकल आणि ७०० ट्रेनला लेट मार्क लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागले आहे. साखळी ओढण्याच्या (चैन पुलिंग) घटना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

३३२ चैन पुलिंगच्या घटना - मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे प्रवास काही प्रवाशांकडून विनाकारण अलार्म चैन पुलिंग करण्याचा घटना वाढल्या आहेत. काही आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात अलार्म चैन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा रेल्वे थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याश्या कारणासाठीही ही चैन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. कारण १ एप्रिल, २०२२ ते ३० एप्रिल, २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेचा मुंबई विभागात अलार्म चैन पुलिंगची एकूण ३३२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी ५३ प्रकरणे वैध कारणांमुळे न्याय्य म्हणून नोंदवण्यात आली आहेत. २७९ प्रकरणे अनावश्यक, अवास्तव म्हणून नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण १८८ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ९४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. मात्र, या चैन पुलिंगच्या घटनेमुळे दोन हजार ३०० लोकल आणि ७०० रेल्वेला लेट मार्क लागला आहे.

रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन - अलार्म चैन पुलिंगच्या घटना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेचा मुंबईतील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की, अनावश्यक, आणिबाणी व्यतिरिक्त कारणांसाठी चैन पुलिंगचा वापर करू नका. ज्यामुळे उर्वरित प्रवाशांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत चैन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहनही रेल्वे करीत आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Ayodhya Tour : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून 11 रेल्वे गाड्यांची बुकिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.