ETV Bharat / city

ठाकरे कुटुंबातील तीन सदस्यांची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी

author img

By

Published : Oct 5, 2022, 8:34 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळाव्यात हजेरी लावून बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी भरूभरून कौतूक केले. त्या पाठोपाठ बाळासाहेबांचे चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव यांनी आणि त्याच्या आई स्मिता ठाकरे यांनीही व्यासपीठावर हजेरी लावली. येथे उद्धव ठाकरे सोडता पुर्ण ठाकरे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं असल्याचे दिसत आहे.

ठाकरे कुटुंबातील तीन सदस्यांची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी
ठाकरे कुटुंबातील तीन सदस्यांची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळाव्यात हजेरी लावून बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी भरूभरून कौतूक केले. त्या पाठोपाठ बाळासाहेबांचे चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव यांनी आणि त्याच्या आई स्मिता ठाकरे यांनीही व्यासपीठावर हजेरी लावली. येथे उद्धव ठाकरे सोडता पुर्ण ठाकरे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले जयदेव ठाकरे - माझ्या सगळ्यात आवडीचा नेता हा एकनाथ शिंदे आहे. त्याला कधी एकटे पाडू नका, त्याला कधी एकनाथ होऊ देऊ नका असे म्हणत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे बंदू जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले आहे. दरम्यान, ते म्हणाले हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा नेता आहे. त्यामुळे आता सर्व बरखास्त करून पुन्हा निवडणुका होवूद्या आणि शिंदे राज्य येऊद्या अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत एकनाथ शिंदे यांनी आयोजीत केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.