ETV Bharat / city

ईडीकडून परिवहन मंत्री अनिल परब यांची 13 तास चौकशी

author img

By

Published : May 26, 2022, 9:10 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी आज (दि. 26 मे) ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी छापेमारी अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली विशेष म्हणजे अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीचा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती त्या अधिकाऱ्याने अनिल परब यांची चौकशी आज केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून निघाले आहे.

अनिल परब
अनिल परब

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी आज (दि. 26 मे) ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी छापेमारी अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली विशेष म्हणजे अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीचा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती त्या अधिकाऱ्याने अनिल परब यांची चौकशी आज केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून निघाले आहे.

अनिल परब यांची आज ईडीने चौकशी केल्यानंतर त्याच्या बांद्र्यातील घरातून काही महत्वाची कागदपत्रेही आज तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. भाजपनेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. ईडीने अनिल परब यांच्या विरोधात इसीआयआर नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित सात ठिकाणी इडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी ही छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरू झाली आहे.

किरीट सोमैया यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि 100 कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. परबांचे यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठे घबाड हाती लागले होते. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे अनिल देशमुखांचा खुलासा - अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचे रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. यापूर्वी किरीट सोमैया यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. या सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परब यांचा पाय खोलात गेला आहे. तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.

ईडीकडून या ठिकाणी छापा

अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ

मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व

अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.

दापोलीतील साई रिसॉर्ट.

दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी.

दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय

शेट्टी बिल्डर, गोवंडी

हेही वाचा - BMC Tender Cancel : सेना भाजपच्या संघर्षात मुंबई महापालिकेचे अनेक टेंडर रद्द, मुंबईच्या विकास कामांना बसतेय खीळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.