ETV Bharat / city

Hindutva : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ

author img

By

Published : May 21, 2022, 7:06 PM IST

Hindutva
हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ

हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी भाजप, मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षाची चढाओढ लागली आहे. त्यामुळे गगनाला भिडलेली महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आदी विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे धार्मिक मुद्द्यांच्या आहारी किती जायचे याचा विचार सर्व घटकांतील सामान्य नागरिकांनी आतापासूनच करायला हवा. अन्यथा भविष्यात याचे परिणाम सर्व घटकांना सोसावे लागतील.

मुंबई - हिजाब, हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांवरील राजकारण आता हिंदुत्वाच्या मुद्दाकडे आले आहे. हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी भाजप, मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षाची चढाओढ लागली आहे. त्यामुळे गगनाला भिडलेली महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आदी विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे धार्मिक मुद्द्यांच्या आहारी किती जायचे याचा विचार सर्व घटकांतील सामान्य नागरिकांनी आतापासूनच करायला हवा. अन्यथा भविष्यात याचे परिणाम सर्व घटकांना सोसावे लागतील, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

धार्मिक मुद्द्यांमुळे जनता भरडली जातेय - देशात महागाई सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवसागणिक वाढणारे इंधनाच्या दरामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. कोरोनानंतर बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र देशातील महागाई, बेरोजगारी, वाढलेले इंधनाचे दर, खाद्य तेलाच्या किमतीकडे सामान्यांचे दुर्लक्ष करण्यासाठी जातीय, धार्मिक वाद चर्चेला आणले गेले आहेत. महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसचे राजकारण आता हिंदुत्वाच्या दिशेने निघाले आहे. राज ठाकरेंची औरंगाबाद येथे या मुद्द्यावर सभा होणार आहे. मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुकार दिल्यानंतर भाजपने शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत डिवचले आहे. शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या धार्मिक मुद्द्यांमुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.

समाजाला घातक वातावरण - हिंदुत्वाच्या मुद्याचे स्वरूप गंभीर झाला आहे. सध्या वितुष्टचे वातावरण निर्माण केले जात आहे. हे समाजाला मोठे घातक आहे. आगामी काळातील भविष्य कसे असेल, हा जगण्याचा मोठा प्रश्न आहे. आज धर्माच्या नावावर जगण्याचा प्रश्न निर्माण केल्याने भविष्यात माणूस म्हणून जगता येईल का.? याबाबत लोकांनी जागृत राहायला हवे. या सगळ्या गोष्टी का अन कशासाठी केल्या जात आहेत, याचा विचार होण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विरोचन रावते यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न मागे - एकीकडे वैज्ञानिक विज्ञान, तंत्रज्ञानातील नवनवीन क्षितिज गाठुन जगावर भारताची छाप पडत आहेत. भारतीय सुशिक्षित तरुण वर्ग जगात आपल्या बुद्धी चातुर्याने मोठी पद भूषवित आहे. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या राजकीय पक्षांकडून तरुण वर्गाला धर्मांधतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुण वर्गाचे सामर्थ एकत्र करून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याऐवजी जाती धर्माचे वाद निर्माण केले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांना भेडसावणारा महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीचा मुद्दा मागे पडतो आहे. सर्व सामान्य नागरिकांनी आपल्या भवितव्याचा विचार करावा, असे युवा नागरिक अमित राणे यांनी सांगितले.

आभासी शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न - देशांमध्ये सर्व राजकीय पक्ष विकासाची भाषा सोडून अचानक भाषा बोलायला लागले आहेत. देशासमोर महागाई, इंधन दरवाढमुळे वाढलेली खाद्यपदार्थ, फळभाज्याचे दर, महागाई, प्रचंड बेरोजगारी शिवाय विविध समस्या भेडसावत आहेत. पाणी, स्वच्छता आदी नागरी समस्या या संदर्भातील अनेक प्रश्न अनेक शहरांसमोर आहेत. याबाबत बोलण्याची क्षमता राजकीय पक्षाची आता उरलेली नाही. याचे कारण बहुतांश राजकीय पक्ष तिकडे सत्तेत आहेत, तिथे आर्थिक कारणांमुळे, भ्रष्टाचारामुळे किंवा अन्य कारणांनी या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये बहुतांश पक्ष अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे असे काही धार्मिक विद्वेष करणाऱ्या मुद्द्यातून एका विशिष्ट वर्गाला भारावून टाकता येते. त्यांच लक्ष या सर्व मुद्द्यांवरून वळवता येत त्यामुळेच हनुमान चालीसा, भोंगे, हिजाब असे अनेक मुद्दे घेऊन आभासी शत्रू समोर उभा करून आणि त्याचं भय दाखवून लोकांना भ्रमित केलं जातं त्याचा अनुभव सध्या येत असल्याचे मत राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Lal Mahal Lavani Controversy : लाल महालात लावणी केलेल्या जागेचे मराठा महासंघाच्यावतीने शुद्धीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.