ETV Bharat / city

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Dec 16, 2020, 6:58 PM IST

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यासोबतच एमएमआरडीएला आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या प्रकरणात कोर्टाने पडू नये ही जागा राज्य सरकारचीच आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Kanjurmarg Metro Carshed Latest News
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच

मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यासोबतच एमएमआरडीएला आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या प्रकरणात कोर्टाने पडू नये ही जागा राज्य सरकारचीच आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच

'ती' जागा राज्य सरकारच्याच मालकिची

मेट्रोचे कारशेड हे कांजूरमार्ग येथेच व्हावे असा रिपोर्ट समितीने दिला होता. त्यानंतर मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र आता कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, इतिहास असा आहे की इंग्रजांनी जाताना जागेची फाळणी केली होती. त्यानुसार ही जागा मुंबई इलाक्याची आहे, म्हणजेच राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात पडू नये. दरम्यान मेट्रो कारशेडला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडी सरकार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.