ETV Bharat / city

Phone Tapping Case : संजय पांडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Aug 4, 2022, 6:32 PM IST

Phone Tapping Case
फोन टॅपिंग प्रकरण

संजय पांडे यांचा जामीन अर्ज राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ( Rouse Avenue Court ) फेटाळला ( Sanjay Pandey's bail application rejected ) आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ( Phone tapping case ) ईडीने त्यांना अटक केली आहे. फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी मंगळवारी सुनावण्यात आली होती.

मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणात नुकतेच ईडीने अटक केलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जामीन अर्ज राऊस अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील ( NSE ) कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी मंगळवारी सुनावण्यात आली होती. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात आला. आज तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे संजय पांडेच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.

  • Rouse Avenue Court dismissed the bail petition of Sanjay Pandey, former Mumbai Police Commissioner recently arrested by ED in connection with the NSE phone tapping case

    (File photo) pic.twitter.com/i78FJOJCzS

    — ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, न्यायमूर्ती सुनेना शर्मा यांनी २९ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीची कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा पांडे यांनी जामीनासाठी अर्ज देखील केला होता. त्यावर आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने मंगळवारी पांडे यांना १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

हेही वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'

एनएसईच्या माजी संचालकांना अटक - ईडीने यापूर्वी 14 जुलै रोजी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना न्यायालयाच्या परवानगीवर चौकशी केल्यानंतर अटक केली होती. न्यायाधीशांनी यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार त्यांना कारागृहातून हजर करण्यात आले होते. ईडीच्या याचिकेवर न्यायमूर्तींनी रामकृष्णाविरुद्ध प्रॉडक्शन वॉरंट जारी केले होते. रामकृष्णला हजर करण्यात आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती.

हेही वाचा - ED summons Varsha Raut : संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स; उद्या होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.