ETV Bharat / city

Governor Bhagat Singh Koshyari :  राजकीय वातावरण तापल्यावर अखेर काय म्हणाले राज्यपाल

author img

By

Published : Jul 30, 2022, 1:27 PM IST

Updated : Jul 30, 2022, 2:22 PM IST

मुंबई (Mumbai) येथे दिनांक २९ जुलै २०२२ रोजी चौकाच्या नामकरण व उद्घाटनाच्या प्रसंगी; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या भाषणासंदर्भात आपली भूमिका (The role of the governor was finally) स्पष्ट केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. 'छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे'.असे म्हणत राज्यपालांनी तापणाऱ्या राजकीय (clarified in the heated political environment) वातावरणाला गारवा दिला.

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : (Mumbai) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी, काल एका कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र आणि मराठी माणसासंबंधीत केलेल्या वक्तव्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी आपली मते परखडपणे मांडली. चारही बाजुंनी तापणारे (clarified in the heated political environment) राजकीय वातावरण बघता, राज्यपालांनी आज आपली भुमिका (The role of the governor was finally) स्पष्ट केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. 'छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे'. अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.


काय म्हटले आहे राज्यपालांनी ? : मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्यामुळेच अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.


मराठी माणसाला कमी लेखन्याचा हेतू नाही? : काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात, मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास! : पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे," असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.

हेही वाचा : Amol Mitkari Criticize Governor : मराठी माणसाचा अपमान खपवून घेणार नाही, राज्यपालांनी माफी मागावी - अमोल मिटकरी

Last Updated :Jul 30, 2022, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.