ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: राजभवनाकडून व्हायरल झालेले ते पत्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारे- पृथ्वीराज चव्हाण

author img

By

Published : Jun 29, 2022, 12:16 PM IST

Raj Bhavan
राज भवन

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Reble MLA Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार शेवटची घटका ( Mahavikas Aghadi Government In Trouble ) मोजत आहे. काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात ( Mahavikas Aghadi in minority )आले असून बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून विधान भवन सचिवांना विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र धाडण्यात आले होते. आता या पत्रावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Chief Minister Prithviraj Chavan ) यांनी शंका उपस्थित केली आहे.

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Reble MLA Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार शेवटची घटका ( Mahavikas Aghadi Government In Trouble ) मोजत आहे. अशातच काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात ( Mahavikas Aghadi in minority )आले असून बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतू यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून विधान भवन सचिवांना विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र धाडण्यात आले होते. या पत्रावर 29 जून ही तारीख होती. आता या पत्राला घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Chief Minister Prithviraj Chavan )यांनी शंका उपस्थित केली आहे.

एकिकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळामागे भाजप असल्याचा आरोप सातत्याने शिवसेना करत आली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतले घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडूनही अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत या सर्व सत्ता नाट्यावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या भाजपने अचानक आक्रमक होऊन कालच देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर, मुंबईत आल्यावर भाजप नेत्यांशी चर्चा करून लगेच राजभवन गाठले. या सर्व घडामोडी होत असताना राजभवनला सुद्धा या घडामोडींची माहिती झाली होती का? अशी शंकाही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली. कारण एकीकडे राज्यपाल महोदय व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व त्यांच्या शिष्टमंडळाची राज्यपाल यांच्याशी भेट होत असताना दुसरीकडे लगेचच विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र तयार करण्यात आले जे पत्र तयार करण्यात आले आहे त्या पत्रात 29 जून ही तारीख असल्याकारणाने व कालचे पत्र वायरल झाले असल्याने नेमकं या पत्राचे गौडबंगाल काय? अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह? - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे कदाचित ही बैठक ठाकरे सरकारची शेवटची बैठक असू शकते. परंतु या बैठकीविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यपालांनी आता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असल्याकारणाने याचा स्पष्ट उद्देश असा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसल्याने हे सरकार अल्पमतात आहे, अशा परिस्थितीत आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही होऊ शकते की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. विशेष करून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद नामांतराचा मुद्दासमोर येणार असल्यानं याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

राफेलच्या वेगाने राज्यपालांचे काम? - एकीकडे राजभवनामधून विशेष अधिवेशनासाठी व्हायरल झालेल्या पत्र्याची चर्चा रंगली असताना, दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांचे काम हे राफेल विमानाच्या वेगाने होत असल्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता मागील आठ दिवसांपासून या सर्व घडामोडी भाजप टिम बसून बघत होती. पण, काल त्यांनी अचानक राजकीय नाट्याच्या मुख्य रंगमंचावर प्रवेश करत या राजकीय सत्ता नाट्याचा अंतिम अंक सुरू केला आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.