ETV Bharat / city

Aurangabad Crime औरंगाबादमध्ये प्रियकरकाडून प्रेयसीची गळा चिरून हत्या

author img

By

Published : Aug 17, 2022, 4:29 PM IST

Updated : Aug 17, 2022, 10:58 PM IST

शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका युट्यूब पत्रकाराने तरुणीची गळा चिरून हत्या Girlfriend's throat slit केली आहे. शहरातील हडको कॉर्नरजवळील डिमार्ट जवळ एका खोलीत तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे.by boyfriend in Aurangabad अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचे नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे.

औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून प्रियसीची प्रियकरकाडून हत्या
औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून प्रियसीची प्रियकरकाडून हत्या

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका युट्यूब पत्रकाराने तरुणीची गळा चिरून हत्या केली आहे. शहरातील हडको कॉर्नरजवळील डिमार्ट जवळ एका खोलीत तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. lover killing the beloved due to a love affair प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचे नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे.

सौरभचं नेहमी येणे जाणे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावात राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. दरम्यान मयत मुलगी अंकिता जालना जिल्ह्यातून एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबादमध्ये आली होती. याच काळात सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेम झाले. अंकिता राहत असलेल्या रूमवर सौरभचे नेहमी येणे जाणे होते.

तीन दिवसांपूर्वी केला खून सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप होते. आज सकाळी सौरभ पुन्हा परत आला आणि दरवाजा उघडून मृतदेह पोत्यात भरून चारचाकी गाडीत टाकून निघून गेला. मात्र याचवेळी त्याने घराचा दरवाजा उघडाच ठेवला. त्यामुळे घरातून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असतांना त्यांना रक्ताचा सडा पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसात जमा झाला एकीकडे पोलीस हत्या झालेल्या घटनास्थळी पोहचले होते. तर दुसरीकडे हत्या करणारा सौरभ चारचाकीत मृतदेह घेऊन ग्रामीण पोलिसांच्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला होता. तसेच आपण हत्या केली असून, मृतदेह गाडीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याचवेळी त्याने मी खून केला असल्याची माहिती पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यांनतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहिती सुद्धा ग्रुपवर टाकली.

शहर पोलिसांनी घेतले ताब्यात सौरभ याने हत्या केलेलं घटनास्थळ हे औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत येते. तर आरोपी ज्या पोलीस ठाण्यात जाऊन जमा झाला आहे तो ग्रामीण हद्दीत येते. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांचं एक पथक देवगाव पोलिस ठाण्याकडे निघाले आहे. त्यानंतर आरोपी आणि मृतदेह पोलीस ताब्यात घेतील. तसेच मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी नेण्यात येईल.

हेही वाचा - नितीन गडकरींचा पत्ता कट, भाजपच्या केंद्रीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश

Last Updated : Aug 17, 2022, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.