जपानच्या धर्तीवर रेल्वेतील पहिले 'पॉड हॉटेल' मुंबई सेंट्रलमध्ये होणार!

author img

By

Published : Aug 16, 2021, 9:23 PM IST

Updated : Aug 16, 2021, 10:14 PM IST

जपानच्या धर्तीवर रेल्वेतील पहिले 'पॉड हॉटेल' मुंबई सेंट्रलमध्ये होणार, आयआरसीटीसी'च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना विश्रांतीसाठी जपानच्या धर्तीवर संपुर्ण सुखसोयींनी सूसज्ज 'पॉड हॉटेल' इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) तयार करण्यात येणार आहे. या पॉड हॉटेलचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होणार आहे. हे हाॅटेल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये राहणार असून, सुखसोईंनी सूसज्ज अशा छोट्या आकारातील हॉटेल असणार आहे. विशेष म्हणजे देशातील पहिले पॉड हॉटेल असणार आहे.

मुंबई - मुंबई सेंट्रल स्थानकांवर प्रवाशांना विश्रांतीसाठी जपानच्या धर्तीवर संपुर्ण सुखसोयींनी सूसज्ज 'पॉड हॉटेल' इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) तयार करण्यात येणार आहे. या पॉड हॉटेलचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होणार आहे. हे हाॅटेल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये राहणार असून, सुखसोईंनी सूसज्ज अशा छोट्या आकारातील हॉटेल असणार आहे. विशेष म्हणजे देशातील पहिले पॉड हॉटेल असणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

३० खोल्याचे असणार पॉड हॉटेल -

रेल्वे स्थानक परिसरातील खासगी हॉटेलचे दर आवाक्याबाहेर असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर त्रास सहन करावा लागतो. यामुळे परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने गेल्या वर्षी घेतला होता. मात्र, कोरोनामुळे पॉड हॉटेलच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई झाली होती. त्यामुळे पॉड हॉटेलचे काम रखडले होते. आता या पॉड हॉटेलच्या कामाला सुरुवात झाली असून यंदा दिवाळी रेल्वे प्रवाशांसाठी हे पॉड हॉटेल प्रत्येक्षात खुले होणार आहे. हे पॉड हॉटेल ३० खोल्याचे असणार आहे. हॉटेल सुरु झाल्यानंतर 12 तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्याने देण्यात येतील, अशी माहितीही आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशा असतील हाॅटेलमध्ये सुविधा-

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हाॅटेलमध्ये सीसीटीव्ही, स्वच्छता गृह, कॉफीशॉप, वॉयफाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असणार आहे. हवेशीर जागा, डिझाईन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्ट अशा अन्य सुविधा, संपुर्ण खोल्या वातानुकूलित असतात. कॅप्सूलच्या आकाराच्या या खोल्या असल्याने या खोल्यांना पॉड हॉटेल असेही बोलले जाते. असे स्पष्टीकरण आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी
दिले आहे.

1 कोटी 80 लाखांचा खर्च -

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर उभारण्यात येणाऱ्या पॉड हॉटेलला अंदाजे 1 कोटी 80 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. लांब पल्लांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या तात्पुरते राहण्याची सोय पॉड हॉटेलमुळे होणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनच्या पॉड हॉटेल बनवले जात आहे. सध्या या पॉड हॉटेलची तांत्रिक कामे, बांधकामे सुरू आहेत. या रूममध्ये अनेक जीवनावश्यक गरजेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळणार आहेत.

दिवाळी खुले प्रवाशांसाठी पॉड हॉटेल-

पॉड हॉटेलची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉड हॉटेलची निर्मिती केली. त्याच धर्तीवर देशातील पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल येथे उभारण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात पॉड हॉटेलचे काम पूर्ण होणार असून, दिवाळी प्रवाशांसाठी हे हॉटेल खुले केले जाणार असल्याची माहिती, इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी दिली आहे.

Last Updated :Aug 16, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.