ETV Bharat / city

Amit Shah vs Thackeray: गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची न्यायालयाने दखल घ्यावी; शिवसेना याचिका दाखल करणार?

author img

By

Published : Sep 7, 2022, 5:17 PM IST

शिवसेना नेते अरविंद सावंत
शिवसेना नेते अरविंद सावंत

शिवसेना कोणाची हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिंदे गट खरी शिवसेना आहे, असे वक्तव्य करतात. (Amit Shah's visit to Mumbai) सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करणार असल्याचे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले. (Amit Shah visit to Mumbai) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी मनसे आणि किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे.

मुंबई - शिवसेनेचा वाद न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले आहे. आज बुधवार (दि. 7 सप्टेंबर)रोजी सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाचे अध्यक्ष चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी यावर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाने चिन्ह गोठवण्याबाबत याचिका दाखल केली. मात्र, मुळात या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. (Amit Shah criticizes Uddhav Thackeray) तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील २७ सप्टेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. परंतु, ५ वर्ष निर्णय लागणार नाही, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यापूर्वी बोलले होते. आता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असे वक्तव्य केले आहे. न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करत आहेत. या सर्व विधानांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घ्यायला हवी. शिवसेनेकडून ही यासंदर्भात याचिका दाखल केली जाईल, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.



जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेनेला जमीन दाखवू असे भाषण ठोकले. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. (What did Amit Shah say about Uddhav Thackeray) आमचीच शिवसेना असा कांगावा करणारे दाढी कुरवाळत होते. किमान जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा, असा हल्लाबोल शिवसेना नेते सावंत यांनी केला. तसेच, शिंदे यांचे वर्तन संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितले आहे. जनता सुज्ञ आहे, ती योग्य न्याय निवडा करेल असेही सावंत म्हणाले.

दिघे साहेबांची गद्दारांबाबत भूमिका स्पष्ट - दिघे साहेब वेगळा महात्मा होते. त्यांचे महात्म्य वेगळे आहे. खरे निष्ठावंत होते. धर्मवीर सिनेमा शिंदेनी स्वतःची भलाभण करण्यासाठी काढला होता. मात्र, गद्दारांबाबत दिघे साहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. ते असताना ठाण्यात जेव्हा गद्दारी झाली, तेव्हा त्यांनी तेथील नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. त्यावरून दिघेसाहेबांची गद्दारीबाबतची भूमिका स्पष्ट दिसून येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे काम करत होते. बाळासाहेब निवर्तल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. एकनाथ शिंदेंवरही उद्धव ठाकरे यांचे खूप उपकार आहेत. उद्धव ठाकरेंनी शिंदेना उभ केले. शिवसेनेतले सर्व पद दिली. त्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, असेही सावंत म्हणाले.

मनसे हे रोज सरड्या प्रमाणे रंग बदलणारा पक्ष - मनसे हा रंग बदलणारा पक्ष आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. आज एक भूमिका तर उद्या दुसरीच भूमिका असा अप्रत्यक्ष चिमटा राज ठाकरे यांना काढला. तर किरीट सोमय्यांवर सडकून टीका केली. त्या भोंग्याबद्दल काय बोलायचे. त्यांनी आज ज्या लोकांवर आरोप केले ते आज सत्तेत आहेत. ते जे आरोप करतात त्याचे पुढे काय झाले? राणेंचे काय झाले? मला विचारण्यापेक्षा आधी तुम्ही त्या भोंग्याला विचारा त्या आरोपांचे काय झाले. मग मला विचारा असेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.