ETV Bharat / city

एटीएसने अटक केलेले 'ते' आरोपी मुंबईतील मंदिराच्या भंडाऱ्यात कालवणार होते विष

author img

By

Published : Jul 24, 2019, 11:06 PM IST

Updated : Jul 24, 2019, 11:32 PM IST

दहशतवादी तरुणांनी मुंब्रा येथे मुंबरेश्वर मंदिराची रेकी करुन भंडाऱ्यातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा कट रचला होता, हे एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये समोर आले आहे.

एटीएसने अटक केलेले दहशतवादी

मुंबई - मुंब्रा येथे मोठ्या घातपात करण्याचा डाव जानेवारीमध्ये एटीएसने उलथून लावला होता. आयसिसच्या १० दहशतवाद्यांना त्यांनी पकडले होते. या दहशतवादी तरुणांनी मुंब्रा येथे मुंबरेश्वर मंदिराची रेकी केली होती आणि भंडाऱ्यातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा कट रचला होता. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या आणि अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

घटनेबाबत माहिती देताना मुंबरेश्वर मंदिर समितीचे सदस्य

मुंब्रा येथील मुंबरेश्वर मंदिर ४०० वर्षे जुने आहे. या मंदिरात १ जानेवारी ते ८ जानेवारी मध्ये भगवद्गीता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ ८ ते १० हजार भाविकांनी घेतला. मात्र, याच प्रसादाच्या विष कालवून भाविकांना मारण्याचा कट एका बाजूला शिजत होता. मुंब्रा आणि औरंगाबाद येथील १० तरुण मिळून हा कट करत होते. त्यासाठी त्यांनी रेकी देखील केली होती. मात्र, एटीएसने वेळीच कारवाई करुन त्यांना पकडले आणि मोठा अनर्थ टळला, असे एटीएसचे म्हणणे आहे.

चार्जशीटनुसार, यातील काही तरुण हे मुंब्रात राहणारे होते. त्यांना मंदिराच्या इतिहासाची चांगली जाणीव होती. त्यामुळे येथे घातपात करुन मास किलिंग करण्याचे षडयंत्र त्यांनी आखले होते. यापैकी अबू हमजा नावाच्या त्यांच्या म्होरक्याने बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग घेतली होती. मुंब्रा बायपास जवळ त्याने बॉम्ब फोडून देखील पाहिले होते. त्याने पकडले जाऊ नये, यासाठी आपापसात संपर्क ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅप ऐवजी टेलिग्राम अॅपचा वापर केला. पण या १० जणांनी मुंब्रातील आणखीन ६ जणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे ६ जण पोलिसांकडे गेल्याने अबू हमजा आणि त्याच्या साथीदारांची बिंग फुटले. नाहीतर महाराष्ट्रात यावर्षी अनेक घातपात आणि रक्तपात बघायला मिळाले असते. जे एटीएसने रोखले आहेत.

Intro:मास किलिंग चा होता प्लॅन एटीएस ने अटक केलेल्या युबाकांच्या चार्ज शीट मध्ये खुलासाBody: मुंबई जवळील मुंब्रा इथे मोठ्या घातपात करण्याचा डाव जानेवारी मध्ये एटीएसने उलथून लावला होता. आयसिसच्या 10 अतिरेक्यांना त्यांनी पकडले होते. या घातपाताची प्लॅनिंग आता समोर आली आहे. एटीएसने पकडलेल्या दहशतवादी तरुणांनी मुंब्रा इथे मुंबरेश्वर मंदिराची रेकी केली होती आणि भांडाऱ्यातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा त्यांचा प्लॅन होता. एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये या आणि अश्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
मुंब्रा येथील मुंबरेश्वर मंदिर 400 वर्षे जुने आहे. या मंदिरात 1 जानेवारी ते 8 जानेवारी मध्ये भगवद्गीता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ 8 ते 10 हजार भाविकांनी घेतला. मात्र याच प्रसादाच्या विष कालवून भाविकांना मारण्याचा प्लॅन एका बाजूला शिजत होता. मुंब्रा आणि औरंगाबाद येथील 10 तरुण मिळून हा प्लॅन करत होते. त्यासाठी त्यांनी रेकी देखील केली होती. मात्र एटीएसने वेळीच कारवाई करून यांना पकडले आणि मोठा अनर्थ टळला, असे एटीएसचे म्हणणे आहे.
चार्जशीट नुसार यातील काही तरुण हे मुंब्रात राहणारे होते. त्यांना मंदिराच्या इतिहासाची चांगली जाणीव होती. त्यामुळे इथे घातपात करून मास किलिंग करण्याचे षडयंत्र त्यांनी आखले होते. बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग यापैकी अबू हमजा नावाच्या त्यांच्या म्होरक्याने केली होती. मुंब्रा बायपास जवळ ते बॉम्ब फोडून देखील त्याने पाहिले होते.
आपापसात संपर्क ठेवण्यासाठी त्यांनी वॉट्स ऍप नव्हे तर टेलिग्राम या ऍपचा वापर केला जेणेकरून बिंग फुटू नये. पण या दहा जणांनी मुंब्रातील आणखीन 6 जणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे 6 जण पोलिसांकडे गेल्याने अबू हमजा आणि त्याच्या साथीदारांची बिंग फुटले. नाहीतर महाराष्ट्रात यावर्षी अनेक घातपात आणि रक्तपात बघायला मिळाले असते. जे एटीएसने रोखले आहेत.

Byte - 1रमेश, मंदिर समिती सदस्य
2 विष्णू पाटील खजिनदार Conclusion:null
Last Updated : Jul 24, 2019, 11:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.