ETV Bharat / city

दबावाला न जुमानता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा- मुख्यमंत्र्यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

author img

By

Published : Oct 20, 2021, 8:09 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले, की मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्य कठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही पाठीशी आहोत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मुंबईत बेसुमार अनधिकृत बांधकाम वाढली आहेत. कोणाच्याही दबावाला न जुमानता महापालिकेने अशा अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुंबईतील सोयी सुविधांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा घेतला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले, की मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्य कठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा. कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळू नये, असे पहा. आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्तयांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम व पूर्ण करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दूरदृश्य प्रणाली बैठक
दूरदृश्य प्रणाली बैठक

हेही वाचा-केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..



डेब्रिज उचलण्यासाठी पथक नेमा

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की कोविड लढाईत मुंबई मॉडेलची प्रशंसा झाली. आपल्या प्रयत्नांमुळे ते शक्य झाले आहे, टीमवर्क म्हणून आपण स्वतः:ला सिद्ध केले आहे. पण एवढ्यावर न थांबता आता आपल्याला नागरी सुविधांवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. दररोजच्या स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथके नेमलेली असतात. त्याप्रमाणे डेब्रिजसाठीदेखील पथके नेमावीत. बांधकामाचा कचरा, दगड-विटा माती लगेच कसा उचलता येईल हे पाहावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत.

दूरदृश्य प्रणाली बैठक
दूरदृश्य प्रणाली बैठक

हेही वाचा-शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट



साथीचे आजार रोखा

सणांमागून सण येत आहेत. दिवाळी येत आहे. एकीकडे कोविडचा धोका अजूनही संपलेला नाही. युकेमध्ये कोविड संसर्गात परत वेगाने वाढ दिसत आहे. तिथे परत रुग्णालये रुग्णांनी भरत आहेत. मी तेथील काही डॉक्टरशीसुद्धा बोललो आहे. आपल्यालादेखील काळजी घ्यावी लागेल. पावसाळा संपत असताना मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनीदेखील डोके वर काढले आहे. आपण अतिशय काळजीपूर्वक हे रोग पसरण्यापासून रोखले पाहिजेत. त्यादृष्टीने सर्व प्रकारची जनजागृती देखील करा. डासांचा नायनाट प्रभावीपणे होईल. अस्वच्छता राहणार नाही हे पाहण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा-हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचे नाव डांबराने लिहले जाईल -अतुल भातखळकर

दूरदृश्य प्रणालीद्वारा झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्यदेखील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.