ETV Bharat / city

चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा- आम आदमी पक्ष

author img

By

Published : May 2, 2022, 9:27 AM IST

राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षाने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक कार्यक्रम करण्याचे आव्हान नव्हते, तर ती धमकी होती. महाराष्ट्रातील शांतता अशा स्थितीत घेऊन जाण्याची धमकी होती ज्यामध्ये दोन्ही समुदायामध्ये काहीही होऊ शकते. त्यांना चिथावणी दिली जात आहे. राज्यात हनुमान चालिसा आणि भोंगे हे दोन मुद्दे सध्या चर्चेत आहेत, असे आप प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत.

चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा- आम आदमी पक्ष
चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करा- आम आदमी पक्ष

मुंबई - औरंगाबादेत काल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणात त्यांनी ४ मे नंतर भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदींपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू असा नवा अल्टिमेटम दिला आहे. यावर आम आदमी पक्षाकडून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी ही मागणी केली आहे.

आव्हान नाही तर धमकी दिली? - राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षाने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक कार्यक्रम करण्याचे आव्हान नव्हते, तर ती धमकी होती. महाराष्ट्रातील शांतता अशा स्थितीत घेऊन जाण्याची धमकी होती ज्यामध्ये दोन्ही समुदायामध्ये काहीही होऊ शकते. त्यांना चिथावणी दिली जात आहे. राज्यात हनुमान चालिसा आणि भोंगे हे दोन मुद्दे सध्या चर्चेत आहेत, असे आप प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत.

ताबडतोब कारवाईची मागणी - माझी ही मागणी आहे की त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. असे कोणतेही मोठे नेते असले तरी ते शांततेवर हल्ला करणार असतील तर त्यांना अटक करणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाल्या. राज ठाकरे यांनी भोंगे हा धार्मिक मुद्दा नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचे सांगितले आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, जर हा धार्मिक मुद्दा नाही तर हनुमान चालिसाचा मुद्दा कुठून आला. तुम्ही तिकडे जाऊन दुसरं काहीही करू शकता, नाशिक ढोल वाजवा त्यांनी ते नाही सांगितलं. तर हनुमान चालिसा वाजवा असं सांगितलं असतं. जनता खुळी नाही, राज ठाकरे काय करतायत ते सगळ्यांना कळत आहे. अवघड स्थिती निर्माण केरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी करत असल्याचे त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते राज ठाकरे? - लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे. शांतता बिघडवण्याची माझी इच्छा नाही. सर्व लाऊड स्पीकर अनधिकृत असून उत्तर प्रदेशातील स्पीकर उतरवू शकतात तर महाराष्ट्रातही उतरले पाहिजेत. आज १ तारीख आहे, उद्या २ आहे, ३ तारखेला ईद आहे. पण ४ मे नंतर ऐकणार नाही, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरण्यासाठी ३ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.