ETV Bharat / city

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके, ५ कोटी ४० लाख प्रतींचा होणार पुरवठा

author img

By

Published : May 4, 2022, 7:30 PM IST

शालेय वर्ष २०२२-२०२३ करता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

Students will get free textbooks on the first day of school - varsha gaikwad
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

मुंबई - शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाला आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. वर्षा गायकवाड यांनी बालभारतीच्या गोरेगाव भांडारात पाठ्यपुस्तकांनी भरलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने राज्यभरात रवाना करण्यात आली.

Students will get free textbooks on the first day of school - varsha gaikwad
पाठ्यपुस्तकांनी भरलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने राज्यभरात रवाना करण्यात आली

मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ( Samagra Shiksha Abhiyan ) राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्याकरता आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे ( free textbooks ) वितरण सुरु करण्यात आले आहे.

Students will get free textbooks on the first day of school - varsha gaikwad
पाठ्यपुस्तकांनी भरलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने राज्यभरात रवाना करण्यात आली

शालेय वर्ष २०२२-२०२३ करता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

पुणे येथे शिक्षण आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा - पुणे येथील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियान वितरणास राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे उपस्थित होते.

हेही वाचा : शाहू वैदिक विद्यालयातून कोल्हापुरात घडत आहेत अनेक बहुजन - मराठा पुरोहित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.