ETV Bharat / city

ST Workers Strike: एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम.. फाशी दिली तरी मागे हटणार नाही

author img

By

Published : Nov 27, 2021, 4:58 PM IST

Updated : Nov 27, 2021, 5:31 PM IST

विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी (ST Workers Strike) आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता फाशी दिली तरी आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार संपकऱ्यांनी केला आहे.

ST Workers Strike
ST Workers Strike

मुंबई - गेल्या 18 दिवसांपासून विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी (ST Workers Strike) आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता फाशी दिली तरी आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार संपकऱ्यांनी केला आहे. कारवाईचा बडगा उगारला असतानाही संपकरी माघार घेत नसल्याने राज्य सरकारची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

भूलथापांना कोणी बळी पडणार नाही -

ग्रामीण जीवनाची लाईफलाईन असलेली एसटी कोरोना काळात पूर्णत: ठप्प होती. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर एसटी पुन्हा सुरू झाली. प्रवाशी एसटीकडे वळू लागले असतानाच आधीच तोट्यात असलेल्या परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी हाक दिली. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या संपाचा भडका राज्यभरात पसरला. राज्यातील २५० डेपो बंद झाले. एसटीच बंद झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. राज्य सरकारने अंतरिम वेतनवाढ देत (Pay hike st workers), संप मागे घेण्याचे आवाहन केले. वेतनवाढ नको, राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. गेल्या १८ दिवसांपासून आझाद ठाण मांडले आहे. तर दुसरीकडे सेवेत रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा परिवहन महामंडळाने दिला होता. त्यानुसार आज सुमारे १२ ते १३ हजार कर्मचारी सेवेत रुजू झाल्याचे परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे. राज्य सरकार धूळफेक करत आहे. कोणीही कामावर गेलेला नाही. राज्य सरकारच्या भूलथापांना आता कर्मचारी बळी पडणार नाहीत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा इशारा संपकऱ्यांनी दिला आहे.

एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम
कुटुंबाला ही देह दंड द्या -
वेतनवाढ कधीही मागितली नव्हती. विलिनीकरण हीच मुख्य मागणी होती. राज्य सरकारकडून डेपोतून गाड्या सांगितले जात आहे. दहा गाड्या सुटल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही विलीनीकरणच्या मतावर ठाम आहोत. परिवहन मंत्र्यांच्या सगळ्या शिक्षा संपल्या असतील आणि शेवटचा उपाय म्हणून आम्हाला फाशी देणार असतील तर ती सुद्धा घ्यायला तयार आहोत, असे संपकऱ्यांनी ठणकावले. तसेच संपकऱ्यांच्या कुटुंबाला देह दंड ही देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपकऱ्यांनी सांगितले. अनेक प्रसार माध्यमे चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.
विलिनीकरणाचा लढा सुरूच -
कर्मचारी संघटनांना आगारातून हद्दपार केले आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी प्राणाची आहुती देण्यापर्यंत तयार आहोत. शासनाने जालियनवाला बाग हत्याकांड केला तरी आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे. आझाद मैदानात कोणत्याही संघटना उतरल्या नाहीत. संपाचा तिढा सोडवायचा असेल कर्मचाऱ्यांशी बोलून तोडगा काढावा. शिवाय, एसटीच्या तोट्याला राज्य जबाबदार आहे. वेळीच निर्णय घेतला असता तर आज वेळ आली नसती, असे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनकर्ते अजिबात कमी झालेले नाहीत. विलिनीकरणाच्या मागणीवर सगळे ठाम असून जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील असा सूचक इशाराही संपकऱ्यांनी दिला आहे.
Last Updated : Nov 27, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.