ETV Bharat / city

HC on ST Workers Strike : एसटीच्या विलीनीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा - सदावर्ते

author img

By

Published : Dec 20, 2021, 7:42 PM IST

Updated : Dec 20, 2021, 8:03 PM IST

एसटी महामंडळाला शासनात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 56 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमली (Mumbai High Court on ST Strike) असून आज या समितीचा प्राथमिक अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. मात्र, हा अहवाल कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारा असून राज्य सरकार (Mumbai High Court hearing on merger of ST) एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

ST Workers Strike
ST Workers Strike

मुंबई - एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचा (ST Workers Strike) अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमली असून आज या समितीचा प्राथमिक अहवाल न्यायालयासमोर सादर (Mumbai High Court on ST Strike)करण्यात आला. मात्र, हा अहवाल कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारा असून राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मात्र, न्यायालयाने राज्य शासनाची आणि कामगारांच्या वकिलांचे मत ऐकून सुनावणी पुढे ढकलली आहे. तर आता एसटीच्या संपावर २२ डिसेंबर 2021 ला सुनावणी होणार आहे. यामुळे आता राज्यभरातील एक लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे (Mumbai High Court hearing on merger of ST) लागले आहे.

उच्च न्यायालयातील कामकाजाची माहिती देताना वकील गुणरत्न सदावर्ते
आज न्यायालयात काय झाले -
एसटी महामंडळाला शासनात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 56 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. या संप प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी (Mumbai High Court hearing on merger of ST) सुरू झाली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची संपकऱ्याची मागणी असल्याने या विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने उच्चस्तरीय त्रिसदस्यीय (Mumbai High Court on ST Strike)समिती नेमली आहे. या समितीचा प्राथमिक अहवाल आज न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे. सरकारी वकिलांनी हा अहवाल न्यायालयासमोर वाचून दाखविला. याशिवाय सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, कामगाराना २ ते ३ टक्के वार्षिक पगारवाढ देऊन पूर्तता केली आहे. समितीला पूर्ण अहवाल यायला खूप वेळ आहे. विलिनीकरण मुद्दा निकाली लागत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे. त्याच्या वेतनाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सध्या १३ हजार बसेसपैकी ३ हजार ४०० बसेस सध्या रस्त्यावर धावत आहेत.
शाळकरी मुलांच्या नुकसानाला जबाबदार कोण..?
सध्या शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वाहतुकीचे एकमेव साधन एसटी आहे. संपामुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचे मोठे नुकसान होत आहे, याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्नही न्यायालयाने (Mumbai High Court on ST Strike) कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि सरकारी वकिलाला विचारला आहे.

प्राथमिक अहवाल कागरांची दिशाभूल करणारा - सदावर्ते

पहिल्या दिवशीपासून एसटीला शासनात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन (ST Workers Strike) सुरु आहे. मात्र शासनाने पगार वाढ देऊ केली आहे. मात्र आमची प्रमुख मागणी शासनाने मान्य केली नाही. त्यामुळे हा संप इतक्या दिवस सुरु आहे. आता न्यायालयाच्या सूचनेनंतर गठीत केल्या त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल सुद्धा कामगारांची दिशाभूल करणारा असून राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. याशिवाय ९० टक्के संपकरी कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रतिदावा केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. पूर्वी संपकरी कर्मचाऱ्यांपैकी ३४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्याची संख्या आज ५४ वर गेल्याचा दावाही सदावर्ते यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे.

..तरच एसटी कर्मचारी कामावर रुजू होणार -

राज्यात जवळपास अजून ७० हजार एसटी कर्मचारी संपावरच आहेत. गेल्या २ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike)सुरूच आहे. संपाच्या १५ दिवसांनंतर राज्य सरकारने ४१ टक्के पगारवाढ करत संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम राहिल्याने या संपावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा वेतनवाढ ही प्रमुख मागणी नव्हतीच. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण हाच प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे आता राज्य सरकारने विलीनीकरणाविषयी सकारात्मक भाष्य करावे. त्यानंतरच संपकरी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, अशी माहिती ही गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

Last Updated :Dec 20, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.