ETV Bharat / city

Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत योग मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व; खरेदी आणि गुंतवणुकीसाठी मोठा योग

author img

By

Published : Jul 28, 2022, 1:36 PM IST

Updated : Jul 28, 2022, 2:08 PM IST

गुरुपुष्यामृत योग हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देशभरातून नागरिक सोने खरेदी ( People Buying Gold ) करण्यासाठी येतात. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह केला जात नाही. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते ( Pushya Nakshatra is best Nakshatras ).

Gurupushyamrut Yog
Gurupushyamrut Yog

मुंबई - हिंदू धर्मात सण उत्सवांना विशेष महत्व आहे. शुभ मुहूर्तावर नेहमीच मोठ्या कांमांना सुरूवात केली जाते. त्याचे चांगले परिणाम पहायला मिळतात अशी धारणा असते. 28 जुलै म्हणजे आजच गुरुपुष्यामृत योग ( Gurupushyamrut Yog ) आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त जवळ आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू पुष्य नक्षत्र ( Guru Pushya Nakshatra ) हेअत्यंत चांगले मानले जाते. महत्त्वाच्या आणि मोठ्या खरेदीसाठी हा योग अतिशय शूभ मानला ( auspicious for important and big purchases ) जातो.

सोने खरेदीसाठी शुभ - गुरुपुष्यामृत योग हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देशभरातून नागरिक सोने खरेदी ( People Buying Gold ) करण्यासाठी येतात. तिथेही अनेक नागरिक सराफ दुकानात सोने खरेदीसाठी येत असतात. दरवर्षी गुरुपुष्यामृत योगच्या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्रीच्या माध्यमातून सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची आर्थिल उलाढाल होत असते.

गुरुपुष्यामृतयोगाचे महत्त्व - गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग असतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केल्याच त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह केला जात नाही. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानला जातो. खरेदी आणि गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी हा मोठा योग आहे.

गुरुपुष्यामृतयोग तिथी - 28 जुलै 2022 रोजी (गुरुवारी) आहे. गुरुपुष्यामृतयोगचा आरंभ 28 जुलै 2022 रोजी रोजी सकाळी 07:06 वाजता सुरू होतो. गुरुपुष्यामृतयोगची समाप्ती 29 जुलै 2022 रोजी सकाळी 09:47 वाजता होत आहे.

गुरुपुष्यामृतयोगाचे खास वैशिष्ट्ये - ज्योतिष शास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते ( Pushya Nakshatra is best Nakshatras ). पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तांपैकी एक आहे. अभिजीत मुहूर्त हा नारायणाच्या ‘चक्रसूदर्शना’इतकाच शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो.

हेही वाचा - Deep Amavasya : दीप अमावस्या म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय ? कशी साजरी करतात? जाणून घ्या सोप्या पद्धतीने

Last Updated :Jul 28, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.