Navratri 2022 : नवरात्रीत सिल्वर ज्वेलरी, व आरशाच्या कपड्यांना मागणी

author img

By

Published : Sep 24, 2022, 6:53 PM IST

Navratri 2022
आरशाच्या कपड्यांना मागणी ()

सोमवारी सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची (Navratri 2022) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे तरूणाई कपड्यांसोबत विशेषतः महिला व मुली दागिने खरेदीकडेही विशेष लक्ष देत असून, सिल्वर रंगाच्या व ऑकसाईड ज्वेलरीला मोठी मागणी (Silver jewelery and mirror clothes are in demand) मिळत आहे.

नवी मुंबई - सोमवारी सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची (Navratri 2022) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. कोरोना काळात सणांवर लागलेले निर्बंध दोन वर्षा नंतर हटले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा अनोखा उत्साह सर्व स्तरात आहे. यावर्षी अबाल थोर तसेच तरुणाईला छान गरबा खेळता येणार आहे. त्यामुळे तरूणाई कपड्यांसोबत विशेषतः महिला व मुली दागिने खरेदीकडेही विशेष लक्ष देत असून, सिल्वर रंगाच्या व ऑकसाईड ज्वेलरीला मोठी मागणी (Silver jewelery and mirror clothes are in demand) मिळत आहे.


अडीचशे पासून सेट उपलब्ध : सिल्वर रंगाच्या व ऑकसाईड ज्वेलरीमध्ये बिंदीया, बांगड्या, कर्णफुले, कमरपट्टा, अंगठ्या पैंजण, कमीत कमी अडीचशे रुपयांपासून उपलब्ध असून सध्या या ज्वेलरीचा खप चांगलाच वाढला आहे.

आरशाच्या दागिन्यांना देखील मागणी : आरसा, लाख, जूट, मोती, धाग्यापासून तसेच हॅन्डमेड दागिन्यांना देखील चांगली मागणी मिळतं आहे. भुलेश्वर मार्केटमध्ये हे दागिने 300 रुपयांपासून 3000 रुपयां पर्यंत मिळत आहेत.

घागरा-चोली, मोजडी यांनाही मोठी मागणी : तरुणाईमध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून; सर्व बाजारपेठेत घागरा चोली चणीया चोली, धोती कुर्ता, असे रंगीबेरंगी कपडे मार्केटमध्ये आले आहे. स्त्रियांसोबत हौशी पुरुषही खरेदीकडे लक्ष देत आहेत. या शिवाय पायात घालणाऱ्या मोजडीला देखील मोठी मागणी असून आरशाची मोजडी व कपड्यांची जास्त खरेदी केली जात आहे. त्याच सोबत विविध वेबसाईटवरून देखील हे दागिने व कपडे उपलब्ध असल्याने तरूणी ऑनलाइन मागवत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.