ETV Bharat / city

सावधान.. लसीकरणावर भामट्यांची नजर, नागरिकांची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक

author img

By

Published : Apr 30, 2021, 4:33 PM IST

लसीकरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रात नियमित सुरू होण्याआधीच तुम्हाला स्वस्तात लस उपलब्ध करून देऊ, लसींचे आरक्षण, मोफत लसीकरण अशी विविध आमिषे आणि खोट्या जाहिराती समाजमाध्यमे, इंटरनेटवर प्रसिद्ध करून नागरिकांना आकर्षित केले जाऊ शकते. त्यानंतर आगाऊ पैसे स्वीकारून लस न देता फसवणूक व मालवेअरच्या माध्यमातून नागरिकांची संवेदनशील माहिती मिळवून आर्थिक गंडा, इंटरनेट बँकिंगसाठी आवश्यक असलेले तपशील मिळवून फसवणूक आदी प्रकार घडू शकतात.

fraud-to-citizens-in-corona-vaccination-registration
fraud-to-citizens-in-corona-vaccination-registration

मुंबई - प्रतिबंधात्मक लसींच्या निमित्ताने ऑनलाइन भामटे नागरिकांना लक्ष्य करू शकतात, असा अंदाज वर्तवत राज्याच्या सायबर विभागाने सतर्क राहाण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात विविध शासकीय, खासगी यंत्रणांचे नाव वापरून उपचार पद्धतीबाबत माहिती देण्याच्या नावे भामट्यांनी नागरिकांना लक्ष्य करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली जाऊ शकते.


जगभरात प्रतिबंधात्मक लसींची निर्मिती झाली आहे. काही ठिकाणी उत्पादन सुरु आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. भारतात मात्र लसींचा तुटवडा आहे. या परिस्थितीचा फायदा घेत शासकीय लसीकरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रात नियमित सुरू होण्याआधीच तुम्हाला स्वस्तात लस उपलब्ध करून देऊ, लसींचे आरक्षण, मोफत लसीकरण अशी विविध आमिषे आणि खोट्या जाहिराती समाजमाध्यमे, इंटरनेटवर प्रसिद्ध करून नागरिकांना आकर्षित केले जाऊ शकते. त्यानंतर आगाऊ पैसे स्वीकारून लस न देता फसवणूक व मालवेअरच्या माध्यमातून नागरिकांची संवेदनशील माहिती मिळवून आर्थिक गंडा, इंटरनेट बँकिंगसाठी आवश्यक असलेले तपशील मिळवून फसवणूक आदी प्रकार घडू शकतात.

लसीकरणावर भामट्यांची नजर
ऑनलाइन भामटे गुन्ह्याची पद्धत बदलणार नाहीत. पद्धत तीच, फक्त निमित्त कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे असेल, असे सायबर महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक लसींबाबत अन्य देशांप्रमाणे भारतातही उत्सुकता आहे. भारतात अन्य देशांच्या तुलनेत लसींची मागणी जास्त आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन विविध कंपन्यांची लस, त्याचे फायदे, किंमत, परिणाम आदी माहिती देण्याच्या निमित्तानेही भामटे नागरिकांच्या संगणक, भ्रमणध्वनीत मालवेअर सोडू शकतात, अ‍ॅपद्वारे संवेदनशील माहिती चोरू शकतात. याच माहितीद्वारे हे भामटे तुमचे अकाऊंटमधील सर्व पैसे काढून तुमची फसवणूक करू शकतात.त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवण्याऐवजी भामटे भलतेच रसायन नागरिकांच्या हाती देऊ शकतात. अशा बनावट लसींच्या वापराने शरीरावर दुष्परिणामही संभवू शकतात, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे गुन्हे घडलेले नाहीत किंवा तशा तक्रारीही प्राप्त नाहीत. मात्र भामट्यांच्या गुन्हे पद्धतीचा अभ्यास केल्यावर लसींच्या निमित्ताने भामटे मधाळ आमिषे दाखवून नागरिकांसाठी सापळे रचू शकतात, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
काय आहेत सायबर विभागाच्या सूचना -
कोरोना लसीकरण आणि वितरण या संबंधित बातम्यांसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा.
लसीसंदर्भातील कोणत्याही बातम्यांसाठी सरकारने विकसित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवा. अशा घटना घडत असतील तर त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर द्या किंवा तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला भेट द्या.
कोरोना लसीसंबंधी कोणत्याही संकेतस्थळावरून किंवा जाहिराती पाहून लस खरेदी करू नका.
सोशल मीडियावर प्रसारित केलेले कोणतेही संदेश किंवा पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड करु नका.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.